एक लग्न केलं ही सामान्य गोष्ट आहे. आपण एका व्यकतीने तीन लग्न केले असेही एकले असेल, मात्र एका व्यक्तीला नऊ बायका आहेत आणि तो त्यांना वेळ देण्यासाठी टाइम टेबल तयार करतो हे एकून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण हे खर आहे.
हा रंजक किस्सा आर्थर ओउर्सो या ब्राझिलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची आहे. ज्याने एका वर्षापूर्वी नऊ स्त्रियांशी लग्न केले होते. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं, पण नंतर जेव्हा 'प्रेम किंवा शारिरीक संबंधाचा मुद्दा उपस्थिती झाला तेव्हा मात्र त्याच्या नाकी नऊ आले आणि सगळच अवघड झालं.
यावर उपाय म्हणून त्याने काय करावं तर या साठी त्याने 'सेक्स रोस्टर' म्हणजेच 'टाईम टेबल ऑफ लव्ह'तयार केला आहे. पण, 9 बायका असलेल्या नवऱ्यासाठी हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं.
द सनच्या वृत्तानुसार, आर्थरने सांगितले की, या रोस्टरला फॉलो करणे खूप कंटाळवाणे काम होते. खर तर त्याने एकदाच लग्न करता येणार या प्रथेच्या निषेधार्थ त्याने एकाच वेळी 9 महिलांशी लग्न केले होते.
Man creates rotating 'sex roster' to keep all his 9 wives happy
त्याने 9 बायकांसोबत लग्न करून 'प्रेम करण्याच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला'. त्याचे लग्न झाले असले तरी सर्व बायकांना समान प्रेम देणे सोपे काम नव्हते. त्यामुळे त्यांनी रोस्टर किंवा वेळापत्रक बनवायचे ठरवले, पण त्यातही त्याला यश आले नाही. त्याला हे काम खूप कंटाळवाने वाटू लागले.
आर्थरच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा त्याला सेक्स सुखासाठी नाही तर शेड्यूल केले आहे म्हणून कारावे लागले. मात्र त्याने लवकरच हा टाइम टेबल बंद केला आणि आता तो आपल्या बायकांसोबत नेहमीप्रमाणे लैंगिक संबंध ठेवत आहे याचा सर्वांनाच आनंद होत आहे. आर्थरच्या बायकांनाही या नव्या प्लॅनिंगबाबत कोणतीही अडचण नाही.
भेटवस्तूंच्या बाबतीत बायकांमध्ये नक्कीच मत्सर असतो. खरे तर एका बायकोला महागडे गिफ्ट आणि दुसऱ्या बायकोला स्वस्त गिफ्ट मिळाले की साहजिकच त्यांना एकमेकिंचा हेवा वाटायला लागतो.
वृत्तानुसार, तो सध्या त्याच्या एका पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. तिला त्याच्यापासून वेगळे व्हायचे आहे कारण तिला ते सर्व आता नको झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.