Zeenat Aman In Goa: एव्हरग्रीन अभिनेत्री गोव्यात करतेय Chill; पाच फोटो शेअर करुन चाहत्यांना विचारला प्रश्न

Zeenat Aman: झीनत यांनी जॉर्डन हार्परच्या 'एव्हरीबडी नोज' या कादंबरीचा फोटोही शेअर केला आहे.
Actress Zeenat Aman
Actress Zeenat AmanDainik Gomantak
Published on

Zeenat Aman In Goa

पणजी: बॉलिवूड चित्रपटांच्या Evergreen काळातील अभिनेत्री झीनत अमान यांनी गोव्यातील ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडिया फ्रेंडली असणाऱ्या झीनत इन्स्टाग्रामद्वारे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.

Zeenat Aman In Goa
Zeenat Aman In GoaInstagram

'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या झीनत, ऑफ-व्हाइट आउटफिटमध्ये सोफ्यावर आराम करताना दिसत आहेत. त्यांनी सनग्लासेस आणि ब्राउन शूज देखील घातले आहेत.

Instagram

दुसऱ्या फोटोत त्यांनी सनग्लासेससोबत लुईस ग्लकचा एक कोट शेअर केला आहे. 'विस्मरणातून जे परत येते ते त्याचा आवाज शोधण्यासाठी परत येते', अशा अर्थाचा एक कोट त्यावर लिहिला आहे.

Actress Zeenat Aman
Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत मेगा भरती! गोवा, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी संधी; भरतीची संपूर्ण माहिती
Instagram

यात पुढे झीनत यांनी सौंदर्यप्रधानाने आणि साधने जसं की, मेकअप ब्रश, लिपस्टिक, ब्रॉन्झर, हायलाइटर, ब्लश आणि फेस क्रीम यांचा फोटो शेअर केला आहे.

Zeenat Aman Goa Photos
Zeenat Aman Goa PhotosInstagram

शेवटच्या फोटोत झीनत लाल फुलांचा ड्रेस घालून कुठेतरी जाताना दिसत आहेत. त्यांनी या पोस्टला एक मजेशीर शीर्षक देखील दिले आहे.

झीनत यांनी चाहत्यांना सहापैकी कोणते चित्र सर्वोत्कृष्ट आहे ते सांगा असे विचारले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com