आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. राजकारणाच्या जगातही महिलांनी आपली छाप सोडली आहे.
आज (4 फेब्रुवारी) आम्ही तुम्हाला या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगभरातील अशा काही महिला राजकारण्यांची ओळख करुन देणार आहोत ज्या सौंदर्यात कोणत्याही मॉडेलला मागे टाकू शकतात.
जुजुआ कैपुटोवा या एक स्लोवाकियन राजकारणी, वकील आणि पर्यावरणवादी आहेत. त्या 2019 ते 2024 पर्यंत स्लोवाकियाच्या राष्ट्रपती राहिल्या आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतात कोणत्याही ओळखीची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची त्यांची भेट यादगार होती.
क्लॉडिया शीनबॉम यांचे नावही आजकाल चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवरील टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी ट्रम्पशी चर्चा केली होती.
तुम्ही कोसोवो देशाचे नाव क्वचितच ऐकले असेल. पण एकदा तुम्ही इथल्या राष्ट्रपतींचा फोटो पाहिला की तुम्हाला हा देश दिर्घकाळ स्मरणात राहील. येथील अध्यक्ष जोसा उस्मानी आहेत.
जॉर्डनची राणी रनिया देखील अनेकदा त्यांच्या सौंदर्यासाठी चर्चेत राहतात. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा स्वतःचे आणि कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात.
स्लोव्हेनिया येथील नताशा पिर्क मुसार या स्लोव्हेनियन वकील आणि लेखिका आहेत. 2022 पासून त्या त्यांच्या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती आहेत.
सारा पालिन या एक अमेरिकन राजकारणी आहेत. त्या अलास्काच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. याशिवाय, 2008 मध्ये जेव्हा सारा पालिन अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत होती तेव्हा त्यांचे नाव चर्चेत आले.
युलिया या दोनदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष राहिल्या आहेत. युक्रेनमध्ये या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला राजकारणी आहेत.
हिना रब्बानी खार या पाकिस्तानातील प्रसिद्ध महिला राजकारण्यांपैकी एक आहेत. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री राहिल्या आहेत. 2011 मध्ये परराष्ट्र मंत्री असताना त्यांचा भारत दौरा चर्चेत राहिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.