गाजरचा रस (Carrot juice) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच गाजराचा रस चेहऱ्यावर लावल्याने ग्लो वाढतो. यासाठी त्यात गाजराचा रस काढून त्यात कापूस भिजवावा आणि हळूहळू चेहऱ्यावर लावावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.
संत्र्याचा रसामध्ये (Orange Juice) व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. संत्र्याचा रस काढून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून दोनदा केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
स्ट्रॉबेरीचा रस (Strawberry juice) चेहऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. स्ट्रॉबेरीचा रस चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुवावे. तुम्ही यामध्ये दही देखील टाकू शकता.
आवळ्याचा रस (Amala Juice) आपल्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असतो. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. हा रस आठवड्यातून चेहऱ्यावर दोनदा लावावे.
डाळिंबाचा रस (Pomegranate juice) आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे चेहऱ्यांवरील तेलकटपणा कमी होतो. डाळिंबाच्या रसामध्ये मुलतानी माती मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरील (Face) पीपल्स आणि तेलकटपणा कमी होतो. (Skin Care Tips)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.