सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मान्सून पर्यटन स्थळांचे रिल पाहायला मिळत आहेत.
प्रसिद्धीसाठी जीवाशी धोका पत्करुन रिल काढण्याची पद्धत सध्याच्या तरुण पिढीमध्ये वाढलेली दिसून येत आहे.
तुम्हालाही पावसामध्ये पर्यटनाचा आनंद घ्यायचा असले तर खालील जबाबदाऱ्य़ा घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणाचे सौंदर्य कॅमेरामध्ये कैद करत असताना, अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.
तुम्ही ज्या ठिकाणी पर्यटन करण्यास जाणार असाल तेथील कोसळत असणाऱ्या पावसाचा अंदाज घ्या तसेच परवानगी असेल त्याच ठिकाणी जा.
वृत्तपत्र तसेच बातम्याच्या माध्यमातून हवामान विभागाचा अंदाज घ्या त्यानंतर ट्रीपचा प्लॅन करा.
जो रस्ता अधिक वळणाचा आहे त्या ठिकाणी रिल्स काढणे शक्यतो टाळा, अशा सिस्थित अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
खोल दरीच्या जवळ जाऊन रिल्स बनवने टाळा,तेथे अपघाताची शक्यता अधिक असते.
धबधब्य़ांच्या ठिकाणे खोल पाण्यात जाणे टाळा तसेच उंचावरुन पडणाऱ्या पाण्याखाली जाऊ नका