युद्ध: जग सध्या युद्धाच्या सावटाखाली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास युद्धाने चिंता वाढवली आहे.
इस्त्रायल-इराण आमने-सामने: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात लेबनॉनसह इराणनेही उडी घेतली आहे. इस्त्रायल आणि इराण आमने-सामने आले आहेत.
अमेरिका: अमेरिकेने आपला मित्र देश इस्रायलच्या सुरक्षेसाठी मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे. इस्रायलला असे सुरक्षा कवच मिळेल की, इराण आणि त्याच्या प्रॉक्सींना इस्त्रायली सीमेत प्रवेश करणे कठीण होईल.
THAAD सिस्टिम: पेंटागॉनने जाहीर केले की, ते इस्रायलला ॲडव्हान्स्ड अँटी मिसाइल सिस्टीम (THAAD) पुरवणार आहेत. याशिवाय, अमेरिका इस्रायलमध्ये अतिरिक्त सैन्यही तैनात करणार आहे.
अमेरिकी सैन्य: अमेरिकेच्या संरक्षण विभागाने रविवारी सांगितले की, पेंटागॉनचे प्रमुख लॉयड ऑस्टिन यांनी देशाच्या हवाई संरक्षणास बळकट करण्यासाठी इस्रायलमध्ये टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (THAAD) बॅटरी आणि अमेरिकन सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
रिपोर्ट: काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या रिपोर्टनुसार, यूएस आर्मीकडे सात THAAD बॅटरी आहेत. ही प्रणाली पॅट्रियट इंटरसेप्टरला पूरक मानली जाते. प्रत्येक THAAD मध्ये सहा ट्रक-माउंट केलेले लाँचर, 48 इंटरसेप्टर्स, रेडिओ आणि रडार उपकरणे असतात आणि त्यांना ऑपरेट करण्यासाठी 95 सैनिकांची आवश्यकता असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.