Alert: तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड 6 सेकंदात होऊ शकते हॅक,अशी घ्या काळजी

डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर गुन्ह्यामध्येही वाढ झाली आहे.
 credit debit card Safety Tips, Safety Tips to Prevent credit debit card Frauds
credit debit card Safety Tips, Safety Tips to Prevent credit debit card Frauds Dainik Gomantak
Published on
online fraud
online fraud Dainik Gomantak

कोरोना विषाणूच्या महामारीनंतर डिजिटल व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर गुन्ह्यामध्येही वाढ झाली आहे. डिजिटल युगात सायबर गुन्हेगार आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहेत. तुमचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड 6 सेकंदात हक्क होऊ शकते. नॉर्ड विपीएन NordVPN ने अलीकडेच 140 देशांमधील 40 दशलक्ष पेमेंट कार्ड्सचा अभ्यास करून असे समोर आले आहे की डेबिट किंवा क्रेडिट कार्ड केवळ 6 सेकंदामध्ये हॅक केले जाऊ शकते. (Safety Tips to Prevent Credit, debit card Frauds)

online payment
online payment Dainik Gomantak

या अभ्यासवरुन ग्राहकाला समजण्याआधीच त्याचे काही सेकंदात बँक बॅलेन्स रिमके होऊ शकते. नॉर्ड विपीएन च्या सिटीओ च्या मते डार्क वेबवर मोठ्या संख्येने पेमेंट कार्ड मिळवण्याचा एकच मार्ग आहे आणि ती पद्धत आहे ब्रूट फोर्सिंग (Brute Forcing) या पद्धतीत हॅकर्स तुमच्या कार्ड नंबर आणि सीवीवी अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात.

credit card
credit card Dainik Gomantak

कार्डचा पहिलला 6 ते 8 क्रमांक हा जारी कर्त्यांचा आयडी क्रमांक असतो. हॅकर्सना कार्डचा केवळ 7 ते 9 नंबरचा अंदाज घ्यावा लागतो. नंबर टाकताच चूक झाली की नाही हे ठरविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. संगणक वापरुन या प्रकारच्या हल्ल्याला फक्त सहा सेकंड लागू शकतो. हे लक्षात घेऊन, ते म्हणाले की कार्ड वापरकर्त्यांनी संशयास्पद क्रियाकलापांसाठी त्यांच्या मासिक स्टेटमेंटचे पुनरावलोकन करणे आणि तुमच्या बँकेच्या प्रत्येक सुरक्षा सुचनेला त्वरित प्रतिसाद देणे अवश्यक् आहे.

fraud
fraud Dainik Gomantak

वेगवेगळ्या उद्देशांसाठी स्वतंत्र बँक खाते असने आवश्यक आहे. तुमचे पेमेंट कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक केले आहे त्या खात्यात थोडे पैसे ठेवावे. असे म्हटले आहे की, काही बँका तात्पुरती व्हर्च्युअल कार्ड देखील देतात जी तुम्ही ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षित वाटत नसल्यास वापरू शकता.

credit card
credit card Dainik Gomantak

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून नुकतीच एक बूकलेट जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये गुन्हेगारांकडून वापरल्या जाणार्‍या सर्व पद्धती सांगण्यात आल्या होत्या. याशिवाय स्वत:च्या बँक खात्याचे संरक्षण करण्याचे अनेक मार्गही यामध्ये सांगण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहार करण्याची गती आणि सुलभता सुधारल्यामुळे किरकोळ आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की, फसवणूक करणारे सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com