हिऱ्यासारखे चमकणाऱ्या हिरव्या डोळ्यांना मिळाला 3 कोटींचा पुरस्कार

जगातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी दरवर्षी HIPA हा पुरस्कार दिला जातो.
A photo of green eyes girl
A photo of green eyes girlTwitter
Published on
Updated on
A photo of green eyes girl
A photo of green eyes girlTwitter

जगातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी दरवर्षी HIPA हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची स्थापना 2011 मध्ये दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन रशीद बिन मोहम्मद अल मकतूम यांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. पुरस्कार देण्यासाठी दरवर्षी फोटो निवडीची वेगळी थीम ठेवली जाते.

Omani photographer Turki bin Ibrahim al Junaibi
Omani photographer Turki bin Ibrahim al JunaibiTwitter

ओमानी छायाचित्रकार तुर्की बिन इब्राहिम अल जुनैबी (Omani photographer Turki bin Ibrahim al Junaibi ) यांच्या छायाचित्राला यावर्षीचा हमदान आंतरराष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार (HIPA) मिळाला आहे. जुनैबीने एका ओमानी मुलीचा फोटो क्लिक केला होता जिचे हिरवे डोळे हिऱ्यासारखे (Girl with green Eyes) चमकत होते. पुरस्कारामध्ये जुनैबीला सुमारे 3 कोटी रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

A photo of green eyes girl
A photo of green eyes girlTwitter

''डोळे' या थीमवर आयोजित फोटोग्राफी स्पर्धेत जुनैबीने जगभरातील 1000 हून अधिक छायाचित्रकारांसोबत भाग घेतला होता आणि त्यात आपल्या फोटोंचा समावेश केला होता. जुनैबीने मीडियाला सांगितले की, त्याने मेसिराह आइसलँडवर या मुलीचा फोटो क्लिक केला होता.

A photo of green eyes girl
A photo of green eyes girlTwitter

छायाचित्रकार जुनैबी कोरोनापूर्वी भारतात आला आहे. यादरम्यान त्याने बनारसचे अनेक फोटो आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत.

A photo of green eyes girl
A photo of green eyes girlTwitter

जुनैबीने सांगितले की, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मला ओमानचे सौंदर्य जगासमोर आणायचे आहे, जेणेकरून येथे पर्यटकांची संख्या वाढेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com