राष्ट्रीय प्राणी आणि पक्ष्यांचे मांस खाणारे 'हे' 8 देश तुम्हाला माहितीयेत का? वाचा

राष्ट्रीय प्राणी आणि पक्ष्यांचे मांस खाणारे 'हे' 8 देश तुम्हाला माहितीयेत का? वाचा
8 countries who eat their national animals meatsDainik Gomantak
Published on
8 countries who eat their national animals meats
8 countries who eat their national animals meats

आहार: जगात लोक दोन प्रकारचा आहार (शाकाहार आणि मांसाहार) घेतात. त्यातही मासांहार करणाऱ्यांचे प्रमाण हे शाकाहार करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे.

8 countries who eat their national animals meats
8 countries who eat their national animals meats

राष्ट्रीय पक्षी आणि प्राणी: आज (3 सप्टेंबर) आपण राष्ट्रीय पक्षी आणि प्राण्यांचे मांस खाणाऱ्या 8 देशांबद्दल जाणून घेणारोत.

Swedish elk
Swedish elk

1. स्वीडन: स्वीडिश एल्क हा स्वीडनचा राष्ट्रीय प्राणी आहे. स्वीडनमध्ये एल्कचे मांस खातात.

2- स्पेन: स्पॅनिश बूल हा स्पेनचा राष्ट्रीय प्राणी आहे. स्पेनमध्ये दरवर्षी 8 दिवस बैलांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. बैलाचे मांस हा स्पॅनिश लोकांच्या आहाराचा मुख्य घटक आहे.

3. सौदी अरेबिया: सौदी अरेबियात लोक उंटाचे मांस आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खात होते. उंटाचे मांस हा सौदी लोकांच्या आहाराचा प्रमुख घटक होता. पण अलीकडेच उंटाचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात आलीय.

 rabbit
rabbit

4. मोनॅको: मोनॅकोमध्ये एक नाही तर तीन राष्ट्रीय प्राणी आहेत, यामध्ये हेजहोग, ससा आणि वुड माउसचा समावेश होतो. मोनॅकोमध्ये पर्यटक आणि स्थानिक लोक सशाचे मांस आवडीने खातात.

Bison
Bison

5. अमेरिका: अमेरिकेतील लोक सुरुवातीपासून बाल्ड ईगलला आपला राष्ट्रीय पक्षी मानत आले आहेत, परंतु राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायसनला देशाचा अधिकृत राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत बायसनचे मांस खातात.

bear
bear

6. फिनलंड: फिनलंडमध्ये तपकिरी अस्वल हे राष्ट्रीय प्राणी मानले जाते. पूर्व फिनलंडमध्ये तपकिरी अस्वल मोठ्या प्रमाणात आढळतात आणि तिथले लोक त्यांचे मांस खातात.

Swan
Swan

7. डेन्मार्क: सुंदर हंस खाण्याची कल्पना करणे कठीण आहे, परंतु डेन्मार्कचे लोक ही हिम्मत करतात. 1984 मध्ये हंस हा डेन्मार्कचा राष्ट्रीय पशु बनला. डॅनिश इतिहासात राजेशाही दरबारात हंसाचे (स्वान) मांस हा एक आवडता खाद्यपदार्थ होता. आजही स्वानचे मांस लोक खातात.

Kangaroo
Kangaroo

8. ऑस्ट्रेलिया: कांगारु हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. गेल्या दशकापासून ऑस्ट्रेलियातील लोकांनी कांगारुचे मांस मोठ्या प्रमाणात खाण्यास सुरुवात केली आहे. कांगारुचे मांस स्टेक्स, मीटबॉल, कबाब, सॉसेज आणि बरेच काही स्वरुपात खाल्ले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com