गोवा अनेक अर्थांनी खास आहे. दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोव्यात येणारा प्रत्येकजण इथल्या खाद्यसंस्कृतीचा दिवाणा आहे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकाला विविध प्रकारचे फूड्स खायला मिळतात. इथल्या विविध प्रकारच्या सी-फूड्सची चव चाखल्याशिवाय पर्यटक राहू शकत नाही. आज आपण इमेज स्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध रेस्टारंट्सविषयी जाणून घेणार आहोत.
1. इमली कॅफे, उत्तर गोवा: हा कॅफे अरम्बोळमध्ये आहे. इथे तुम्हाला विविध प्रकारच्या फूड्सची चव चाखायला मिळते.
2. ला प्लेज, उत्तर गोवा: इथे तुम्हाला फ्रेंच, इटालियन आणि अमेरिकन खाद्यपदार्थ खायला मिळतात. हे रेस्टॉरंट उत्तर गोव्यातील रेस्टॉरंट्समध्ये अव्वल स्थानावर आहे.
3. भट्टी गाव, उत्तर गोवा: इथे तुम्हाला गोवन घरगुती पद्धतीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळे पदार्थ इथे दिले जातात. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत इथे एकदा नक्की भेट दिली पाहिजे.
4. थलासा, उत्तरी गोवा: हे रेस्टांरट गोव्यातील एक छोटेसे ग्रीस आहे. इथे तुम्हाला ग्रीस देशातील खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळते. गोव्यातील स्थानिक लोक मोठ्याप्रमाणात या रेस्टारंटमध्ये जातात.
5. स्पाइस गोवा, उत्तर गोवा: जर तुम्ही स्थानिक गोवन फूडचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी हे रेस्टारंट खूप खास आहे. इथे तुम्हाला हरएक प्रकारच्या फिश डिशेस खायला मिळतील.
6. बर्गर फॅक्टरी, उत्तर गोवा: इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर खायला मिळतील. इथे तुम्हाला व्हेज-नॉनव्हेज बर्गर खायला मिळतात.
7. ब्रिटोस बार, उत्तर गोवा: बागा बीचवरील या प्रसिद्ध रेस्टॉरंटला तुम्ही एकदा भेट दिली तर कधीही विसरु शकणार नाही. थंड बिअरसह येथे दिले जाणारे सीफूड तुम्हाला मंत्रमुग्ध करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.