Lucky Zodiac Signs 2026: आर्थिक संकट अन् करिअरवर टांगती तलवार! 'या' राशीसाठी धोक्याची घंटा; शुक्राची उलटी चाल ठरणार कठीण काळाची नांदी

Lucky Zodiac Signs 2026: कन्या राशीत सध्या शुक्राचे गोचर सुरु आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा धन स्थानाचा स्वामी मानला जातो
Lucky Zodiac Signs 2026
Lucky Zodiac SignsDainik Gomantak
Published on
Updated on

Lucky Zodiac Signs 2026: कन्या राशीत सध्या शुक्राचे गोचर सुरु आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा धन स्थानाचा स्वामी मानला जातो. धन स्थानाचा स्वामी नीच राशीत आल्यामुळे या काळात तुम्हाला पैशांशी संबंधित विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक बाबींमध्ये कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळावे लागेल. या काळात तुमच्या वर्तनात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे संबंध बिघडण्याची आणि करिअरवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

योग्य नियोजनाशिवाय काम केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, विरोधक किंवा शत्रूंना हलक्यात घेण्याची चूक अजिबात करु नका. कर्ज (Loan), आजारपण आणि शत्रू या तीन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आयुष्य मोठ्या अडचणीत सापडू शकते.

Lucky Zodiac Signs 2026
Horoscope: गुरुवारचा दिवस 'या' राशींसाठी वरदान! धनलाभासह करिअरमध्ये प्रगती, मोठे निर्णय ठरणार फायदेशीर; रखडलेली कामं पूर्ण होणार

आर्थिक व्यवहारात खबरदारी बाळगा

कन्या राशीच्या जातकांनी सध्या व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आपल्या व्यवसायाचा विस्तार घाईघाईने करु नका. जुन्या चुकांमधून शिकून कामाची पद्धत सुधारण्याचा प्रयत्न करा. चढ-उताराच्या काळात भावूक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायचीच असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि विचारपूर्वकच पाऊल टाका. अनावश्यक खरेदीवर होणारा उधळपट्टीचा खर्च टाळा. जर तुमच्यावर आधीचे काही कर्ज किंवा लोन असेल, तर ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा राग आणि चिडचिड तुमच्यावर हावी होऊ शकते, त्यामुळे मन शांत ठेवणे गरजेचे आहे.

Lucky Zodiac Signs 2026
Horoscope: मंगळवारी धनलाभाचे संकेत! 'या' दोन राशींना नोकरीत मोठी प्रगती, उत्पन्न वाढण्याची शक्यता; अडकलेले पैसे परत मिळणार

कन्या राशीसाठी सोपे आणि प्रभावी उपाय

येणारा काळ सोपा आणि सुखकर व्हावा यासाठी कन्या राशीच्या जातकांनी काही सोपे धार्मिक उपाय केले पाहिजेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रसन्न मनाने 'राम रक्षा स्तोत्रा'चा पाठ करावा. याशिवाय “राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने॥” या मंत्राचा जप रोज करावा. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करावी, ज्यामुळे शुक्राचा नीच प्रभाव कमी होऊन घरात समृद्धी येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com