Shukra Gochar 2026: शुक्राचे चित्रा नक्षत्रात आगमन! 'या' भाग्यशाली राशींना मिळणार छप्परफाड संपत्ती; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Venus Transit In Chitra Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सुख, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानल्या गेलेल्या शुक्र ग्रहाने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला असून तो 5 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहणार आहे.
Venus Transit In Chitra Nakshatra 2026
Shukra Gochar 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Venus Transit In Chitra Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सुख, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानल्या गेलेल्या शुक्र ग्रहाने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला असून तो 5 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहणार आहे. यानंतर शुक्र स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राच्या या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार असला, तरी यादरम्यान 4 भाग्यशाली राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या कालावधीत मेष, कर्क, सिंह आणि धनु या राशीच्या जातकांना नशिबाची भक्कम साथ लाभणार असून आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे प्रेम संबंध अधिक घट्ट होऊन नात्यात गोडवा वाढेल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिजनेस करत असाल, तर तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच नोकरदार वर्गाच्या पगारात वाढ होण्याचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी देखील हा काळ खूप फलदायी ठरणार असून नशिबाची साथ मिळाल्यामुळे सर्वकाही मनासारखे होईल.

Venus Transit In Chitra Nakshatra 2026
Horoscope: आजचे राशिभविष्य; धनु, कुंभसह 3 राशींच्या नशिबाला मिळणार नवी कलाटणी; वृषभ-कर्क राशींनी जपून राहा!

कर्क राशीच्या जातकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची उत्तम सुवर्णसंधी मिळेल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. उत्पन्नाचे (Income) नवे स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमच्या बँक बॅलेन्समध्ये मोठी वाढ होईल.

Venus Transit In Chitra Nakshatra 2026
Horoscope: शुक्रवार 'या' 3 राशींसाठी भाग्यशाली! आर्थिक प्रगतीचे संकेत, रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता; मात्र निर्णय घेताना घाई नको!

आर्थिक दृष्टिकोनातून सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी राहणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरणार असून आर्थिक स्थिती सुधारल्याने मन प्रसन्न राहील. धनु राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ लाभेल. कार्यक्षेत्रात उच्च अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे नवीन प्रोजेक्टमध्ये यश हाती लागेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैशांचे व्यवहार मार्गी लागल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com