Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

Surya Guru Dvidwadash Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि देवांचे गुरु बृहस्पती यांच्यात आज (7 सप्टेंबर) अत्यंत दुर्मिळ अशा 'द्विद्वादश दृष्टी योगा'ची निर्मिती होत आहे.
Surya Guru Dvidwadash Yog 2026
Dwidwadash Yog 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Surya Guru Dvidwadash Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि देवांचे गुरु बृहस्पती यांच्यात आज (7 सप्टेंबर) अत्यंत दुर्मिळ अशा 'द्विद्वादश दृष्टी योगा'ची निर्मिती होत आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या भावात असतात, तेव्हा या विशेष योगाची निर्मिती होते. ग्रहांच्या या खास स्थितीमुळे काही विशिष्ट राशींच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला मानसन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक मानले जाते, तर गुरु ग्रहाच्या प्रभावाने ज्ञान, धन आणि समृद्धीमध्ये वाढ होते. या दोन शुभ ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणारा हा योग चार लकी राशींसाठी करिअरमध्ये प्रगती आणि धनाचा वर्षाव करणारा ठरणार आहे.

Surya Guru Dvidwadash Yog 2026
Horoscope: अजा एकादशीला जुळून आला अत्यंत शुभ योग! 'या' राशींचे नशीब चमकणार, पैशांची चणचण मिटून करिअरमध्ये येणार मोठी भरारी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुचा हा द्विद्वादश दृष्टी योग अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. या काळात आर्थिक क्षेत्रात मोठा लाभ मिळण्याची शक्यता असून बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्यासोबतच नवीन नोकरीच्या सुवर्ण संधी चालून येतील तसेच पदोन्नतीचे योग बनत आहेत. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन मन प्रसन्न राहील.

Surya Guru Dvidwadash Yog 2026
Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

दुसरीकडे, कर्क राशीच्या जातकांचे भाग्य या योगामुळे पूर्णपणे उजळून निघणार आहे. समाजात आणि कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल आणि वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून सुख-सुविधांमध्ये मोठी वाढ होईल.

Surya Guru Dvidwadash Yog 2026
Horoscope: गुरूवार 'या' राशींसाठी ठरणार खास! आत्मविश्वासाच्या जोरावर महत्त्वाची कामं पूर्ण होतील, आर्थिक- कौटुंबिक बाबतीतही लाभाचे संकेत

सिंह राशीच्या लोकांसाठी हा शुभ संयोग उत्पन्नाचे (Income) नवीन मार्ग मोकळे करणारा ठरेल. कायदेशीर बाबी किंवा कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि पैतृक संपत्तीतून मोठा फायदा मिळू शकतो. या योगामुळे सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.

Surya Guru Dvidwadash Yog 2026
Horoscope: पुत्रदा एकादशीचा दिवस ठरणार खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, धनलाभासह सुख-समृद्धीचे संकेत; रखडलेली कामेही होतील पूर्ण

तुळ राशीच्या लोकांसाठी देखील द्विद्वादश योग अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे. अचानक मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे मन आनंदी राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना यश मिळून उत्तम संधी प्राप्त होईल, तर व्यापाऱ्यांना एखादी मोठी व्यावसायिक डील मिळून प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, आज बनणारा हा द्विद्वादश दृष्टी योग या चारही राशींच्या आयुष्यात प्रगती आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com