

Surya Gochar Mars Nakshatra 2026: सूर्याने मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी (10 ऑक्टोबर) रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी सूर्यग्रह हस्त नक्षत्रातून बाहेर पडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला ऊर्जा, पराक्रम आणि साहसाचा कारक मानले जाते, तर सूर्य हा मान-सम्मान, उच्च पद आणि नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही शक्तिशाली ग्रहांच्या नक्षत्र बदलाचा सुयोग काही ठराविक राशींच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, विशेषतः आर्थिक बाबींमध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
शरद नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जुळून आलेल्या या शुभ योगाचा सर्वाधिक फायदा मेष राशीच्या लोकांना मिळणार असून, या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नोकरीच्या निमित्ताने प्रयत्न करणाऱ्या किंवा आधीच नोकरीत असलेल्या व्यक्तींसाठी पदोन्नतीचे नवे मार्ग मोकळे होऊ शकतात. तसेच धनलाभाचे योग जुळून येतील. वृषभ राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ उत्तम असून जीवनात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. घेतलेल्या कष्टांचे योग्य आणि सकारात्मक फलित हाती लागल्यामुळे मन प्रसन्न राहील. जर नवीन काही व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल.
सिंह राशीच्या लोकांचे स्वामी स्वतः सूर्यदेव असल्याने या नक्षत्र बदलाचे सर्वात उत्तम परिणाम याच राशीच्या व्यक्तींना प्रकर्षाने जाणवतील. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून आणि उच्चाधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल, तसेच पूर्वी अडकलेला पैसा (Money) अचानक हाती आल्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
कन्या राशीच्या व्यापारी वर्गासाठी हा काळ अतिशय सुवर्ण संधीचा असणार आहे. एखादी मोठी व्यावसायिक डील फायनल झाल्यामुळे भरभक्कम नफा कमावता येईल, शिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी देखील हा सूर्य गोचर लाभदायक ठरणार असून, व्यवसायात चांगला नफा मिळण्यासोबतच बचतीचे नवे पर्याय यशस्वीपणे अंमलात आणता येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.