Surya Gochar 2026: सूर्याचे नक्षत्रात परिवर्तन! 'या' 5 राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी, 6 नोव्हेंबरपर्यंत होणार बक्कळ धनलाभ

Sun Transit Swati Nakshatra 2026 Astrology: ग्रहांचा राजा सूर्य 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी स्वाती नक्षत्रात विराजमान झाला.
Sun Transit Swati Nakshatra 2026 Astrology
Surya Gochar 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sun Transit Swati Nakshatra 2026 Astrology: ग्रहांचा राजा सूर्य 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी स्वाती नक्षत्रात विराजमान झाला. येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत सूर्य याच नक्षत्रात राहणार असून त्यानंतर तो विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या बदलामुळे वृषभ, मिथुन, कन्या, तुळ आणि कुंभ या पाच राशीच्या जातकांना नशिबाची भक्कम साथ लाभणार असून, करिअर आणि व्यवसायात नवी शिखरे सर करता येतील.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवसायत मोठा नफा मिळण्याची शक्यता असून आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर होईल. नव्या प्रोजेक्टची किंवा कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला जात आहे. मिथुन राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुमचे अडकलेले पैशांचे व्यवहार मार्गी लागतील आणि जुने कर्ज वसूल होईल. कामाच्या बाबतीत हा काळ उत्तम असून नोकरीत पदोन्नतीचे (Promotion) योग जुळून येतील, तसेच मेहनत फळास येईल.

Sun Transit Swati Nakshatra 2026 Astrology
Horoscope: गुरुवारी ग्रहांची कृपा, 'या' 4 राशींचे नशीब पालटणार! अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, नोकरीत मिळू शकते मोठी जबाबदारी

कन्या राशीच्या व्यक्तींनाही सूर्य गोचरचा मोठा लाभ मिळेल. भाग्य पूर्णपणे सोबत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी सुवर्णकाळ असेल. नोकरदारांना वेतनवाढ किंवा पगारवाढीची आनंदाची बातमी मिळू शकते. तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. गेल्या अनेक दिवसांपासून सतावणाऱ्या समस्या आता दूर होतील, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. तथापि, नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकवून ठेवण्यासाठी योग्य ताळमेळ ठेवावा लागेल.

Sun Transit Swati Nakshatra 2026 Astrology
Horoscope: धनलाभाचे योग आणि जुनी गुंतवणूक ठरणार फायदेशीर! पैशांच्या बाबतीत मंगळवार 'या' राशींसाठी भाग्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

कुंभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन करिअर आणि व्यापारात उत्तम यश घेऊन आले आहे. प्रामाणिक कष्टाचे योग्य फळ या काळात मिळायला सुरुवात होईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा असून सर्व बाजूंनी आर्थिक सुबत्ता लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.