

Sun Saturn Shadashtak Yog August 2026: वैदिक ज्योतिषात ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि न्यायाचा देवता मानला जाणारा शनी हे दोन्ही अत्यंत प्रभावशाली ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे परम शत्रू मानले जातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य आणि शनीची अशुभ युती किंवा स्थिती निर्माण होते, तेव्हा त्याचा थेट प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. 17 ऑगस्टपासून सूर्य आणि शनी यांच्यात अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानला जाणारा 'षडाष्टक योग' निर्माण झाला.
ज्योतिषात सहावे आणि आठवे स्थान हे संकटे, कर्ज, आजारपण आणि अचानक होणाऱ्या नुकसानाचे मानले जाते. त्यामुळे दोन शत्रू ग्रह या स्थितीत आल्याने विशेषतः तीन राशींच्या जातकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत कसोटीचे ठरणार आहेत.
या षडाष्टक योगाचा सर्वाधिक प्रतिकूल प्रभाव कन्या राशीच्या जातकांवर दिसून येईल. कन्या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा लागेल. तुम्ही योग्य असलात तरी तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. या काळात कुणावरही आंधळा विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे किंवा गुंतवणूक (Investment) करणे मोठे नुकसान घडवू शकते. तसेच वादविवाद आणि मानसिक ताणापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
दुसरी प्रभावित रास म्हणजे कुंभ. कुंभ राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी प्रचंड मानसिक ताण आणि सहकाऱ्यांशी मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. अपेक्षित यश न मिळाल्याने चिडचिड वाढेल आणि घाईगडबडीत नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा निर्णय अंगलट येऊ शकतो. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे आर्थिक बजेट कोलमडण्याची दाट शक्यता आहे.
तिसरी रास म्हणजे मीन. शनीच्या प्रभावामुळे मीन राशीच्या जातकांवर आधीच जबाबदाऱ्यांचे ओझे आहे. त्यातच या षडाष्टक योगामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये वारंवार अडथळे येऊ शकतात. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने मन अस्वस्थ राहील. या काळात भावुक होऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि बचत खर्च करताना सावधगिरी बाळगा. या कठीण काळात केवळ धैर्य आणि संयमच या तीन राशींच्या जातकांना संकटातून बाहेर काढू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.