Vyatipat Yog 2026: पैशांची चणचण अन् मानसिक संताप! सूर्य-चंद्राचा 'व्यतिपात योग' उडवणार 4 राशींची झोप; नशिबाची सुटणार साथ

Vyatipat Yog 31 August: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या योगांना अत्यंत महत्त्व दिले जाते.
Vyatipat Yog 31 August
Vyatipat Yog 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Vyatipat Yog 31 August: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीमुळे निर्माण होणाऱ्या योगांना अत्यंत महत्त्व दिले जाते. काही योग हे शुभ फळ देतात, तर काही योग मानवी जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. असाच एक अत्यंत अशुभ आणि विनाशकारी मानला जाणारा 'व्यतिपात योग' सूर्य आणि चंद्राच्या विशेष युतीमुळे निर्माण होत आहे. हा योग 31 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी होत असून, तो अनेक शुभ व मांगलिक कार्यांसाठी अत्यंत वर्ज्य मानला जातो. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 राशींपैकी मुख्यत्वे चार राशींच्या जातकांना मोठ्या आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या योगाचा सर्वाधिक फटका वृषभ राशीच्या जातकांना बसण्याची शक्यता आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांचे काम बिघडू शकते, त्यामुळे कामाच्या ठिकाणी अजिबात निष्काळजीपणा दाखवणे टाळावे. आर्थिक टंचाईमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. दुसरीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ शत्रूंपासून सावध राहण्याचा आहे. तुमचे गुप्त शत्रू तुमचे मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न करु शकतात. तसेच धनसंचय आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित निर्णय घेताना अत्यंत खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Vyatipat Yog 31 August
Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी देखील व्यतिपात योग अनेक अडचणी घेऊन येणार आहे. या राशीच्या लोकांना जुने कर्ज (Loan) फेडताना मोठी कसरत करावी लागेल. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण आणि मानसिक तणाव वाढेल, तसेच कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत प्रतिकूल ठरु शकतो. विशेषतः जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या चारही राशींच्या जातकांनी या काळात अत्यंत संयमाने आणि विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com