Budhaditya Raja Yoga: सूर्य-बुध युतीने बनणार 'बुधादित्य राजयोग'! 'या' 4 राशी होणार करोडपती; नशीबही सोन्यासारखे चमकणार

Budhaditya Raja Yoga 2026: जेव्हा जेव्हा सूर्य आणि बुध एकाच राशीत किंवा एकमेकांवर दृष्टीक्षेप टाकतात, तेव्हा हा राजयोग तयार होतो, ज्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर पडतो.
Budhaditya Raja Yoga 2026
Budhaditya Raja YogaDainik Gomantak
Published on
Updated on

Budhaditya Raja Yoga 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते. येत्या सोमवारी म्हणजेच 13 जुलै रोजी सकाळी ठीक 6 वाजून 53 मिनिटांनी ग्रहांचा राजा सूर्य आणि बुद्धीचा कारक मानला गेलेला बुध ग्रह एकत्र येत असून, त्यांच्या या युतीमुळे अत्यंत शुभ अशा 'बुधादित्य योगा'ची निर्मिती होत आहे. जेव्हा जेव्हा सूर्य आणि बुध एकाच राशीत किंवा एकमेकांवर दृष्टीक्षेप टाकतात, तेव्हा हा राजयोग तयार होतो, ज्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर पडतो.

प्रख्यात ज्योतिषाचार्यांच्या मते, या शुभ योगाचा उदय होताच अनेक राशींचे भाग्य उजळणार असून, प्रामुख्याने मिथुन, सिंह, कन्या आणि तुळ या 4 राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आणि प्रगतीचा ठरणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना व्यापारात अफाट नफा मिळेल, अडकलेली कामे पूर्ण होतील आणि समाजात मोठे पद व मान-सन्मान प्राप्त होईल.

Budhaditya Raja Yoga 2026
Horoscope 8 July 2026: बुधवारचा दिवस ठरणार खास; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर 'या' राशींना धोक्याचा इशारा! जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

या भाग्यशाली राशींमध्ये पहिली रास मिथुन आहे. सूर्य आणि बुधाच्या या युतीमुळे मिथुन राशीच्या जातकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल आणि कुटुंबात, विशेषतः वडिलांकडून मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम असून करिअरमध्ये पदोन्नतीचे मजबूत योग आहेत.

Budhaditya Raja Yoga 2026
Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

दुसरी भाग्यशाली रास सिंह आहे, ज्यांच्यासाठी हा काळ करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने वरदान ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील, तसेच उत्पन्नाचे (Income) नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प या योगाच्या प्रभावामुळे यशस्वीरित्या पूर्ण होतील.

या यादीतील तिसरी रास कन्या आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आगामी काळ नोकरी आणि व्यवसायात दुहेरी लाभ घेऊन येत आहे. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल. याशिवाय कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे तोंडभरुन कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे वर्चस्व वाढेल.

Budhaditya Raja Yoga 2026
Horoscope: 'संकष्टी चतुर्थी'ला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींचे नशीब उजळणार, धनलाभाचे प्रबळ योग; अडकलेली कामं मार्गी लागणार

चौथी आणि फायनल रास तुळ आहे. तुळ राशीच्या जातकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. सूर्य-बुध युतीच्या प्रभावामुळे तुम्हाला अनपेक्षित किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या जीवनात सर्व बाजूंनी सकारात्मक बदल घडून येतील आणि जुन्या समस्यांमधून तुमची कायमची सुटका होईल. एकूणच, हा बुधादित्य योग या 4 राशींच्या आयुष्यात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com