Shadashtak Yog 2026: अचानक उघडणार कुबेराचा खजिना! शुक्र-शनि ग्रहांचा दुर्मिळ 'षडाष्टक योग'; 4 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Shukra Shani Shadashtak Yoga 2026: द्रिक पंचांगानुसार, आज (23 जुलै) सकाळी 9 वाजून 46 मिनिटांनी शुक्र आणि शनि या ग्रहांनी एकमेकांपासून 150 अंशांच्या अंतरावर येऊन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 'षडाष्टक योग'ची निर्मिती केली.
Shadashtak Yog 2026
Shadashtak Yog 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Shukra Shani Shadashtak Yoga 2026: द्रिक पंचांगानुसार, आज (23 जुलै) सकाळी 9 वाजून 46 मिनिटांनी शुक्र आणि शनि या ग्रहांनी एकमेकांपासून 150 अंशांच्या अंतरावर येऊन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 'षडाष्टक योग'ची निर्मिती केली. ज्योतिषशास्त्रात जेव्हा दोन ग्रह कुंडलीच्या सहाव्या आणि आठव्या भावात एकमेकांसमोर येतात, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो.

ज्योतिषाचार्यांच्या मते, सर्वसामान्यपणे हा योग आव्हानात्मक मानला जात असला, तरी शुक्र आणि शनिच्या या विशेष युतीमुळे मिथुन, तुळ, मकर आणि कुंभ या चार राशींच्या जातकांसाठी यशाची आणि अफाट धनलाभाची नवीन दारे उघडणार आहेत. या कालावधीत केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळून रखडलेल्या कामांना मोठी गती मिळणार आहे.

Shadashtak Yog 2026
Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा योग करिअरमध्ये (Career) मोठी भरारी घेण्याची संधी घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर विश्वास दाखवतील आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवतील. व्यापाऱ्यांना एखादा मोठा क्लायंट मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनिची ही युती अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील आणि नवीन जॉब ऑफर मिळू शकते. आर्थिक नियोजन यशस्वी होऊन घरात सुख-सुविधा वाढतील.

Shadashtak Yog 2026
Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणारा ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामगिरीचे कौतुक होऊन पगारात घसघशीत वाढ किंवा पदोन्नतीवर चर्चा होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळून आर्थिक चिंता दूर होईल. तसेच कुंभ राशीच्या जातकांसाठी हा षडाष्टक योग नवनवीन उपलब्धी घेऊन येणार आहे. व्यापारात केलेली नवी भागीदारी अत्यंत फायदेशीर ठरेल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढल्याने भविष्यात मोठे व्यावसायिक फायदे होतील.

Shadashtak Yog 2026
Horoscope: रविवारी चमकणार 'या' राशींचं नशीब! करिअरमध्ये मिळणार मोठं यश, आर्थिक लाभासह येणार आनंदाची बातमी

एकंदरीत, शुक्र आणि शनिच्या या विशेष ग्रहस्थितीमुळे मिथुन, तुळ, मकर आणि कुंभ या राशींच्या जातकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असून, आर्थिक स्थैर्य, करिअरमधील प्रगती आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com