
हिंदूंकरिता आनंदाचा पर्व मानली जाणारी दिवाळी खास महत्वाची आहे. या दिवशी लोक भगवान गणेश आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांची पूजा करतात. तसेच रात्री फटाके सुद्धा फोडले जातात. द्रिक पंचांगानुसार, यंदा २० ऑक्टोबर २०२५, सोमवार या दिवशी दिवाळी साजरी केली जाईल.
मात्र त्याआधीचा काळ ज्योतिषदृष्ट्या अत्यंत खास मानला जातो, कारण या दरम्यान काही महत्त्वाचे ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार असून, दुर्लभ योग आणि महायुतीचे निर्माण देखील होत आहे. याशिवाय काही युती भंग सुद्धा होत आहेत. सध्या सिंह राशीत शुक्र व केतु यांची युती झाली आहे, जी दिवाळीपूर्वी तुटणार होणार आहे.
१५ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्रदेवांनी सिंह राशीत गोचर केला होता, जिथे ते ९ ऑक्टोबरपर्यंत राहतील. त्याआधी, २९ मे रोजी केतु ग्रह सिंह राशीत प्रवेश केला होता, जिथे तो २०२५ च्या शेवटपर्यंत राहील. अशा परिस्थितीत, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीपूर्वी शुक्र-केतूची युती भंग होणार आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या तीन राशींसाठी धन, वैभव, ऐश्वर्यपूर्ण जीवन, सौंदर्य आणि प्रेमाचे दाता शुक्र व पापी ग्रह केतुची युती तुटणे फायदेशीर ठरेल.
दिवाळीपूर्वी शुक्र-केतूची युती भंग होणे तुला राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. गेल्या काही दिवसांपासून एखादे काम पूर्ण होत नसेल तर ते आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. कामकाजी लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही, उलट गुंतवणुकीच्या सुवर्णसंधी मिळतील. २० ऑक्टोबर २०२५ पूर्वी वडीलधाऱ्यांना कोणत्याही गंभीर आजाराचा त्रास होणार नाही, उलट आरोग्याविषयी सजगता वाढेल.
शुक्र-केतूची युती तुटणे धनु राशीच्या लोकांसाठीही चांगले ठरेल. जुनी गुंतवणूक फायद्याची ठरेल. याशिवाय मालमत्ता खरेदीचा विचार पक्का होईल. तरुण वर्ग करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकेल. दिवाळीपूर्वी घरात शांतता राहील व जुन्या वादांचे निराकरण होईल. ज्येष्ठ व्यक्ती आपला अधिक वेळ धार्मिक कार्यात घालवतील, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि आरोग्यात मोठी घसरण होणार नाही.
तुला आणि धनु राशी व्यतिरिक्त मीन राशीच्या लोकांसाठी देखील शुक्र-केतूची युती तुटणे जीवनात स्थिरता आणणारे ठरेल. नोकरी करणारे लोक मन लावून कार्यक्षेत्रात आपले काम करतील आणि सहकाऱ्यांशी वाद होणार नाही. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांच्या धनप्राप्तीच्या वाटेतल्या अडथळ्यांचा नाश होईल. ज्येष्ठ व्यक्तींना घरच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय दिवाळीच्या घराच्या साफसफाईत एखादी हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.