

Shravan Somwar Som Pradosh Vrat 2026: आज (10 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी असून सोमवारचा अत्यंत पवित्र दिवस आहे. विशेष म्हणजे आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असून चातुर्मासाचा 16वा दिवस आहे. आजचा दिवस अध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत खास मानला जात आहे, कारण आज कामिका एकादशीचे पारण असून सोबतच 'सोम प्रदोष व्रत' देखील आहे. श्रावण महिन्यात सोम प्रदोष व्रताचा असा दुर्मिळ योग येणे अत्यंत शुभ मानले जाते.
पंचांगानुसार, आज आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव असणार आहे, जो जीवनात अचानक मोठे सकारात्मक बदल घडवून आणतो आणि नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी उत्तम वातावरण तयार करतो. भगवान शिवशंकराच्या आराधनेसाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे.
आज अवकाशातील ग्रहांची नक्षत्रे अनेक शुभ संकेत देत आहेत. आज मिथुन राशीमध्ये चंद्र आणि मंगळ एकत्र असल्याने 'चंद्र-मंगळ योग' निर्माण होत आहे, जो आर्थिक फायद्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच, कर्क राशीमध्ये सूर्य, बुध आणि गुरु यांच्या युतीमुळे 'त्रिग्रही योग' कायम राहील. याशिवाय शुक्र कन्या राशीत, शनी मीन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत विराजमान असतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, या महासंयोगाचा थेट प्रभाव लोकांचे करिअर, व्यवसाय, उत्पन्न आणि नवीन संधींवर सकारात्मक रित्या दिसून येईल. यामुळे बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. या अद्भुत ग्रहमानाचा लाभ सर्वच राशींना होणार असला, तरी 5 भाग्यशाली राशींसाठी आजचा दिवस सर्वात जास्त फलदायी ठरणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आज उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होऊ शकतात. नोकरीत तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, तर लव्ह लाईफमध्ये जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कामाचा वेग वाढेल. राशीत असलेल्या मंगळामुळे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील आणि व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये (Career) मोठी ओळख मिळवून देणारा ठरेल. सूर्य, बुध आणि गुरुच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशीच्या जातकांना आज त्यांच्या लोकसंपर्काचा मोठा फायदा होईल. जुन्या ओळखीच्या मदतीने रखडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नात वाढ होईल. कन्या राशीच्या लोकांसाठी आज करिअरला एक नवीन आणि योग्य दिशा मिळू शकते. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्यासोबतच तुमच्या नियोजन कौशल्याचे कौतुक होईल आणि थकीत पैशांबाबत चांगली बातमी कानावर पडेल. एकूणच, शिवकृपेने या पाचही राशींच्या जीवनात आज आनंदाची लाट येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.