Shani Gochar 2026: सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या छायेत शनिदेवाचे नक्षत्र बदल! 20 ऑगस्टपासून 3 राशींचा कठीण काळ सुरु; सोसावा लागणार मोठा आर्थिक फटका

Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा न्यायाधीश मानला जाणारा शनि ग्रह लवकरच आपल्या नक्षत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करणार आहे.
Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026
Shani Gochar 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा न्यायाधीश मानला जाणारा शनि ग्रह लवकरच आपल्या नक्षत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. 20 ऑगस्ट रोजी, गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी शनिदेव वक्री अवस्थेत रेवती नक्षत्राच्या प्रथम पदात प्रवेश करणार आहेत. यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत शनिदेव याच नक्षत्रात विराजमान राहतील आणि त्यानंतर ते उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील.

विशेष म्हणजे, शनीचे हे नक्षत्र परिवर्तन 12 ऑगस्टला होणारे सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टला होणारे चंद्रग्रहण यांच्या अगदी मधोमध घडणार असल्याने त्याचा ज्योतिषीय प्रभाव अत्यंत तीव्र आणि आव्हानात्मक मानला जात आहे. शनीच्या या चालीमुळे प्रामुख्याने मेष, कर्क आणि वृश्चिक या तीन राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026
Horoscope: मंगळवारी कर्क, सिंहसह 'या' 4 राशींना धनलाभाचे प्रबळ संकेत; मंगळागौरीच्या दिवशी शुभ योगांचा विशेष प्रभाव

मेष राशीच्या जातकांसाठी शनिदेवाचे हे नक्षत्र गोचर अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण कालावधी घेऊन येणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकणे गरजेचे आहे. कोणत्याही नवीन व्यवसायात किंवा शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करणे मोठ्या नुकसानाला आमंत्रण ठरु शकते, त्यामुळे सध्या तरी गुंतवणूक (Investment) करणे टाळावे. अचानक वाढणाऱ्या बिनकामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026
Horoscope: श्रावणातील पहिला सोमवार ठरणार अत्यंत शुभ! महादेवांच्या कृपेने तुळ, कुंभसह 'या' 3 राशींचे नशीब उजळणार, आर्थिक लाभ मिळणार

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रचंड मानसिक ताणतणाव घेऊन येणारा ठरेल. नको त्या आणि निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवणे टाळावे लागेल. विशेषतः कौटुंबिक आणि वैयक्तिक नात्यांच्या बाबतीत हा काळ थोडा नाजूक आहे. घरातील सदस्यांसोबत मतभेद किंवा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजांना संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल.

Shani Vakri Revati Nakshatra Effects 2026
Horoscope 29 July 2026: बुधवारचा दिवस ठरणार भाग्यवान! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; धनाचा होणार वर्षाव

वृश्चिक राशीच्या जातकांना या गोचर काळात आर्थिक आघाडीवर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पैशांची टंचाई जाणवू शकते, त्यामुळे आर्थिक व्यवहारात पूर्ण खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. उधारी किंवा कर्ज घेणे-देणे टाळावे. कामाच्या ठिकाणी संयम आणि कठोर परिश्रमावर भर द्यावा लागेल, कारण कामाचा ताण अधिक राहील. यासोबतच, स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करुन चालणार नाही. एकंदरीत, शनीच्या या नक्षत्रीय परिवर्तनामुळे या तीनही राशींच्या आयुष्यात मोठे चढ-उतार येणार असून त्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com