Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

Shadashtak Yog: 13 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ आणि देवगुरु बृहस्पती यांच्या संयोगाने असाच एक महत्त्वाचा षडाष्टक योग तयार होत आहे.
Shadashtak Yog 2026
Shadashtak Yog Dainik Gomantak
Published on
Updated on

Shadashtak Yog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला अत्यंत महत्त्व असून, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या भावात येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये 150 अंशांचा कोन तयार होतो. या स्थितीलाच ज्योतिषशास्त्रात 'षडाष्टक योग' असे म्हटले जाते. सहसा हा योग संघर्षाचा मानला जातो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत हा योग जातकांसाठी प्रगतीची आणि लाभाची दारे देखील उघडतो.

ज्योतिषीय गणनेनुसार, 13 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळ आणि देवगुरु बृहस्पती यांच्या संयोगाने असाच एक महत्त्वाचा षडाष्टक योग तयार होत आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी जेव्हा हे दोन्ही बलाढ्य ग्रह एकमेकांपासून 150 अंशांवर असतील, तेव्हा 5 राशींच्या आयुष्यात भाग्योदयाची नवी पहाट उजाडणार आहे.

या शुभ योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येईल. मंगळ आणि गुरुच्या या स्थितीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळेल. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील आणि तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. जर तुम्ही नवीन व्यवसायाचा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करेल.

Shadashtak Yog 2026
Horoscope: करिअर, पैसा, प्रेम - कोणत्या राशींचे चमकणार नशीब? वाचा आजचे राशिभविष्य

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा योग कार्यक्षेत्रात नवी उंची गाठणारा ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमचे कौतुक होईल. विशेष म्हणजे, जुन्या कर्जातून तुमची सुटका होऊ शकते आणि आरोग्याच्या तक्रारीही दूर होतील. धनु राशीसाठी तर हा काळ सुवर्णकाळाची सुरुवात मानला जात आहे. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अचानक होणाऱ्या धनलाभामुळे तुमची चिंता मिटेल.

Shadashtak Yog 2026
Horoscope 21 January 2026: संकष्टी चतुर्थीला बाप्पा होणार प्रसन्न! 'या' राशींच्या नशिबात असेल धनलाभाचे योग

शेवटी, कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरुचा हा षडाष्टक योग रोजगाराच्या नवीन संधी घेऊन येईल. जे लोक नोकरीत बदल करू इच्छितात किंवा बढतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना या काळात आनंदाची बातमी मिळू शकते. एकंदरीत, हा योग 13 फेब्रुवारी 2026 पासून या पाच राशींच्या जीवनात प्रगती, समृद्धी आणि आनंदाचे नवे पर्व घेऊन येणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com