Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Scorpio Horoscope 2026 Prediction: मंगळ ग्रहाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत संस्मरणीय आणि प्रगतीकारक ठरण्याची शक्यता आहे.
Scorpio Horoscope 2026 Prediction
HoroscopeDainik Gomantak
Published on
Updated on

Scorpio Horoscope 2026 Prediction: मंगळ ग्रहाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत संस्मरणीय आणि प्रगतीकारक ठरण्याची शक्यता आहे. मात्र, हे वर्ष अधिक सुखकर आणि यशस्वी करण्यासाठी काही विशेष महाउपायांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांनी सुचवले. कुंडली तज्ज्ञ पंडित सुरेश पांडेय यांच्या मते, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी चांदी परिधान केल्यास त्यांचे भाग्य अधिक मजबूत होते. चांदी धारण केल्यामुळे केवळ नशिबाची साथ मिळत नाही, तर मानसिक तणावातूनही सुटका मिळते, ज्यामुळे दैनंदिन कामात एकाग्रता वाढते.

धार्मिक उपायांबद्दल सांगताना त्यांनी असे नमूद केले की, प्रत्येक शनिवारी कोणत्याही मंदिरात जाऊन बदाम दान करणे या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरेल. यासोबतच, गुरुवारी गाईचे तूप आणि कापूर दान केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन शुभ फळांची प्राप्ती होते. जे जातक आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे चिंतेत आहेत किंवा ज्यांना कामाच्या ठिकाणी वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी 'मंगल यंत्र' अत्यंत प्रभावी ठरु शकते. आपल्या कार्यक्षेत्रात किंवा ऑफिसमध्ये मंगल यंत्राची स्थापना केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.

Scorpio Horoscope 2026 Prediction
Horoscope Today: बगलामुखी जयंती आणि दुर्गाष्टमीचा अद्भूत संयोग; 'या' राशींवर होणार देवीची अलोट कृपा, रखडलेली कामे मार्गी लागणार

2026 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या राशीचा स्वामी मंगळ याला प्रसन्न ठेवण्यासाठी हे साधे पण अत्यंत परिणामकारक उपाय केल्यास त्यांना आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक स्तरावर अपेक्षित यश नक्कीच मिळेल. हे वर्ष केवळ आव्हाने पेलण्यासाठी नाही, तर आपल्या कष्टाचे फळ मिळवण्यासाठी उत्तम काळ ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com