Shani in Pisces: "आली आली श्रीमंती आली!" शनीच्या कृपेनं 'या' 3 राशींवर होणार धनवर्षाव; नशीब सोन्यासारखं चमकणार

Saturn Transit in Pisces 2026 Effects: 2026 या वर्षात शनीचा मीन राशीतील प्रवेश हा संपूर्ण ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा फेरबदल मानला जात आहे.
Saturn Transit in Pisces 2026 Effects
Shani in PiscesDainik Gomantak
Published on
Updated on

Saturn Transit in Pisces 2026 Effects: 2026 या वर्षात शनीचा मीन राशीतील प्रवेश हा संपूर्ण ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा फेरबदल मानला जात आहे. शनीची ही चाल काही राशींसाठी सुखाचे दिवस घेऊन येणार आहे, तर काहींना कठोर संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीच्या 'पाया'ला विशेष महत्त्व आहे. शनीच्या कृपेने काही राशींच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे, तर काही राशींना सावधगिरीने पावले टाकावी लागणार आहेत.

ज्या राशींना आयुष्यात सुखाचा योग आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. यामध्ये कर्क राशीचा समावेश असून या राशीच्या लोकांसाठी पैसा, नफा आणि सकारात्मकता यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळेल. गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याचे संकेत असून आर्थिक वृद्धीसाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Saturn Transit in Pisces 2026 Effects
Horoscope: आर्थिक चणचण संपणार! गंगा सप्तमीपासून 'या' राशींवर होणार धनवर्षाव, घरात नांदणार सुख-समृद्धी

वृश्चिक राशीसाठी 2026 हे वर्ष स्थिरता आणि सामर्थ्य घेऊन येणार आहे. आरोग्य आणि संपत्ती यामध्ये उत्तम संतुलन राखले जाईल. व्यवसायात नवीन करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरेल आणि रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी तर हे वर्ष 'संधींचा वर्षाव' करणारे ठरेल. मालमत्ता, गुंतवणूक (Investment) आणि करिअरमध्ये मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अचूक निर्णय तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Saturn Transit in Pisces 2026 Effects
Horoscope: ब्रम्हांडात मोठी हालचाल! 'या' राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ; मान-सन्मानही मिळणार

दुसरीकडे, काही राशींना आव्हानांना सामोरे जावू लागू शकते. मेष राशीवर सध्या साडेसातीचा प्रभाव असल्याने त्यांना अत्यंत सावधगिरीने चालावे लागेल. विशेषतः आर्थिक निर्णय घेताना घाई करु नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असल्याने संयम राखणे गरजेचे आहे.

सिंह राशीच्या जातकांना मानसिक तणाव आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य आणि पैशांचे नियोजन यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणताही मोठा धोका पत्करण्यापूर्वी दोनदा विचार करा आणि सकारात्मक विचारसरणीने पुढे जा.

Saturn Transit in Pisces 2026 Effects
Horoscope: सोमवारी 'या' 3 राशींवर होणार शिवकृपेचा वर्षाव; महादेवाच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाची कुलूपं!

धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष स्पर्धेचे आणि विरोधकांचे असेल. तुमचे विरोधक सक्रिय राहतील, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल सतर्कतेने उचलावे लागेल. नियोजन कच्चे राहिल्यास छोटी चूकही महाग पडू शकते. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा आणि धैर्याने परिस्थिती हाताळा. शनीचा हा बदल राशींच्या भाग्यात मोठ्या घडामोडी घडवणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com