Shani Vakri Upay 2026: वक्री शनि वाढवणार 'या' 5 राशींच्या जातकांची डोकेदुखी, नशिबात मोठा संघर्ष; ताबडतोब करा हे उपाय

Saturn Retrograde Ending December 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 27 जुलै 2026 रोजी वक्री झालेला शनि ग्रह आता आगामी 11 डिसेंबर रोजी मार्गी होणार आहे.
Shani Vakri Upay 2026
Shani Vakri UpayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Saturn Retrograde Ending December 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 27 जुलै 2026 रोजी वक्री झालेला शनि ग्रह आता आगामी 11 डिसेंबर रोजी मार्गी होणार आहे. शनीच्या वक्री चालीमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. विशेषतः, ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती चालू आहे, त्यांच्यासाठी 11 डिसेंबरपर्यंतचा हा काळ अधिक आव्हानात्मक आणि तणावपूर्ण ठरु शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीवर शनीची साडेसाती सुरु आहे. यात कुंभ राशीवर साडेसातीचा अंतिम आणि तिसरा टप्पा, मीन राशीवर दुसरा टप्पा, तर मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. याशिवाय सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या प्रभाव टाकून आहे. या सर्व 5 राशींच्या जातकांनी या काळात विशेष काळजी घेणे आणि काही गोष्टींची खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे ठरते.

Shani Vakri Upay 2026
Horoscope 30 Saptember 2026: धनलाभ आणि प्रगतीचा सुवर्णकाळ! ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावाने 'या' राशी होणार मालामाल; बुधवार अत्यंत खास

वक्री शनीच्या या प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे. या काळात कोणत्याही वादामध्ये पडणे, कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या किंवा किरकोळ कारणांवरुन भांडण करणे महागात पडू शकते. तसेच या काळात कोणतेही नवीन कार्य सुरु करणे, नवीन व्यवसाय थाटणे, मोठा आर्थिक गुंतवणूक (Investment) करण्याचा निर्णय घेणे किंवा कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे, अन्यथा शनीच्या अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Shani Vakri Upay 2026
Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

शनी हा कर्माचा दाता आणि न्यायाचा देवता मानला जातो, त्यामुळे स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार येऊ देऊ नका. खोटे बोलणे, फसवणूक करणे, ईर्ष्या बाळगणे किंवा नकळतपणे दुसऱ्याला त्रास देणे टाळावे. प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडावे, कारण बेईमानी करणाऱ्यांना शनीच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो.

Shani Vakri Upay 2026
Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

या कठीण काळात शनीचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी काही सोपे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. प्रत्येक शनिवारी तिळाचे तेल, काळे उडीद, काळे वस्त्र किंवा जौ (जव) दान करावे. निस्वार्थ भावनेने गरजू लोकांची सेवा करावी. शनिवार आणि मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची मनोभावे पूजा करावी, तसेच शनी देवाच्या बीज मंत्राचा जप आणि शनि स्तोत्राचे नियमित पाठ करावेत. या उपायांचे आचरण केल्यास शनीच्या वक्री चालकाळात येणाऱ्या अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com