Rashi Bhavishya 29 October 2024: कष्टाचे फळ मिळण्याचा योग, मित्रांसोबत कराल आनंद साजरा; 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास!
Rashi Bhavishya 30 October 2024Dainik Gomantak

Rashi Bhavishya 30 October 2024: कष्टाचे फळ मिळण्याचा योग, मित्रांसोबत कराल आनंद साजरा; 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास!

Daily Horoscope 30 October 2024: मित्रांसोबत आनंद साजरा कराल.
Published on

आजचे पंचांग

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

  • बुधवार, 30 आक्टोबर 2024, अश्विन कृष्ण पक्ष,

  • शरद ऋतु, क्रोधी नाम संवत्सर,शके 1946.

  • तिथि- त्रयोदशी 13:16

  • रास- सिंह

  • नक्षत्र- हस्त 21l44

  • योग - वैधृति 08l51

  • करण - वणिज 13l16

  • सूर्योदय - 06:39

  • चंद्रोदय - 29:29

  • दिनविशेष- त्रयोदशी वर्ज्य

आजचे राशीभविष्य

मेष- कामासाठीची गडबड महागात पडू शकते, त्यामुळे लक्षपूर्वक कामे करावीत. तसेच, गाडी सावकाश चालवावी कारण अपघात संभवू शकतो.

वृषभ- धनलाभाची शक्यता. आरोग्यासंदर्भात काही समस्या जाणवू शकतात काळजी घ्यावी. तसेच, तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. प्रवासाचा योग आहे.

मिथुन- शेजारी लोकांपासून सावध राहावे, नवीन कार्यात सफलता मिळेल. भावंडांशी संपर्क होईल.

कर्क- घरातील कामे लवकर पूर्ण होत नाहीत म्हणून मानसिक त्रास किंवा चिडचिड होऊ शकते. जमीन किंवा घरासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेऊ नये.

सिंह- शत्रूंपासून सावध राहा, आजारांवर औषधे लवकर कामे करणार नाहीत. थकवा जाणवेल, विश्रांतीची आवश्यकता आहे. मात्र खर्च होऊ वाढू शकतो.

कन्या- नातेवाईकांच्या भेटीचा योग. काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. मौन बाळगावे.

तूळ- आपल्या अधिकार पदाचा चुकीचा वापर करु नका मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, पत्नी/पतीस योग्य तो वेळ द्या जेणेकरुन वाद किंवा गैरसमज वाढणार नाही. वैवाहिक जीवनात शांतता लाभेल.

वृश्चिक- पत्नी/पती कडून विशेष लाभ मिळेल, वरिष्ठांकडून धनप्राप्ती किंवा विशेष लाभाची शक्यता, वडिलोपार्जित संपत्ती, स्थावर जंगम संपत्तीतून फायदा होऊ शकतो. अध्यात्मातील विषय लक्षात येतील.

धनु- सुखकर प्रवास होईल, मात्र अधिक प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

मकर- प्रेमात अपयश, नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या समस्या जाणवतील. शिक्षणात प्रगती कराल. नवीन शिकण्यास मिळेल. सुखवर्धनासाठी कुलदेवतेची आराधना करावी.

कुंभ- कष्टाचे फळ मिळण्याचा योग. उशिरा का होईना पण अपेक्षित लाभाची शक्यता. मित्रांसोबत आनंद साजरा कराल.

मीन- पैशांचा अपव्यय होऊ शकतो. कष्टाचे फळ मिळेल. आनंदी राहाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com