Grah Gochar 2026
Grah GocharDainik Gomantak

Grah Gochar 2026: 120 वर्षांनंतर घडणार मोठा चमत्कार! शुक्र-सूर्य-शनीच्या त्रिनेत्र युतीनं 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Grah Gochar: फेब्रुवारी आणि मार्च 2026 या दोन महिन्यांचा कालावधी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत विलक्षण आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
Published on

Grah Gochar 2026: फेब्रुवारी आणि मार्च 2026 या दोन महिन्यांचा कालावधी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत विलक्षण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. या काळात अवकाशात अशा काही ग्रहांच्या युती होणार आहेत, ज्याचा प्रभाव संपूर्ण मानवजातीवर आणि विशेषतः सर्व राशींवर खोलवर पडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीमध्ये ग्रहांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सध्या कुंभ राशीत राहू, बुध आणि शुक्र आधीच ठाण मांडून बसले आहेत. त्यातच 13 फेब्रुवारीला सूर्याचे आणि 23 फेब्रुवारीला मंगळाचे आगमन होणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस कुंभ राशीत पाच मोठ्या ग्रहांचा दुर्मिळ संयोग पाहायला मिळेल. हा ग्रहांचा खेळ इथेच थांबत नाही, तर मार्च महिना त्याहूनही मोठी खगोलीय घटना घेऊन येणार आहे.

Grah Gochar 2026
Horoscope: करिअर, पैसा, प्रेम - कोणत्या राशींचे चमकणार नशीब? वाचा आजचे राशिभविष्य

मार्च 2026 मध्ये अनेक ग्रह गुरुच्या मालकीच्या मीन राशीत प्रवेश करतील. पंचांगानुसार 2 मार्च रोजी शुक्र आणि 15 मार्च रोजी सूर्य मीन राशीत जाणार आहेत. विशेष म्हणजे कर्मदाता शनिदेव आधीच मीन राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मीन राशीत शुक्र, सूर्य आणि शनि या तीन बलाढ्य ग्रहांची युती होणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, मीन राशीत ही त्रिग्रही युती तब्बल 120 वर्षांनंतर होत आहे. हा कालखंड काही राशींसाठी स्थिरता, करिअरमधील प्रगती आणि दीर्घकालीन लाभ देणारा ठरेल, तर काहींना मानसिक ताण आणि नात्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज भासेल. या महासंयोगामुळे 5 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे.

Grah Gochar 2026
Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा या राशींसाठी ठरणार 'लकी'; लक्ष्मीची कृपा अन् घरात येणार पैसाच पैसा!

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठ्या बदलांचा आणि नवीन संधींचा असेल. करिअर आणि आर्थिक स्थितीत स्पष्ट सुधारणा दिसून येईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरीत बढती आणि समाजात मान-सन्मान वाढेल. सिंह राशीसाठी हा काळ सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. तुमची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील आणि आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील. धनु राशीसाठी ग्रहांची ही स्थिती वरदान ठरेल. गुरु, शुक्र आणि सूर्याची कृपा तुमच्या करिअर आणि शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणेल. जुन्या कर्जातून तुमची सुटका होऊ शकते.

Grah Gochar 2026
Horoscope 4 February 2026: बुधवारी 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा, नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात प्रगती निश्चित

मकर राशीच्या जातकांसाठी धन आणि करिअरमध्ये नवीन वाटा खुल्या होतील. अचानक धनलाभाचे योग असून गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुंभ राशीसाठी तर हा काळ सर्वात महत्त्वाचा आहे, कारण पाच ग्रहांचा संयोग तुमच्याच राशीत होत आहे. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल आणि जुने प्रकल्प यशस्वी होतील. या पाचही राशींच्या व्यक्तींनी आरोग्याकडे (Health) थोडे लक्ष दिल्यास फेब्रुवारी आणि मार्च महिना त्यांच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com