
Rashi wise rakhi colors: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण २०२५ मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. या शुभ दिनी, जर तुम्ही तुमच्या राशीनुसार योग्य रंगाचे वस्त्र परिधान केले किंवा राखीचा रंग निवडला, तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा आणि मजबूत संबंध आणखी वाढतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
मेष: या राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. रक्षाबंधनानिमित्त लाल रंगाचे कपडे परिधान करणे आणि भावाला लाल रंगाची राखी बांधणे हे संबंधांमध्ये दृढता आणते.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढरा किंवा आसमानी रंग भाग्यकारक असतो. या दिवशी तुम्ही आसमानी किंवा या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगाचे वस्त्र निवडू शकता. भावाची रास वृषभ असल्यास, त्याला आसमानी रंगाची राखी बांधणे अधिक शुभ ठरेल.
मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींनी हिरवा किंवा सी-ग्रीन रंग वापरावा. भावालाही याच रंगाची राखी बांधणे नातेसंबंधात सामंजस्य वाढवते.
कर्क: या राशीच्या व्यक्तींनी दूधिया पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. जर तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला दूधिया पांढऱ्या रंगाची राखी बांधणे विशेष फलदायी मानले जाते.
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी नारंगी रंग शुभ असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण-भाऊ दोघांनीही नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करणे उत्तम मानले जाते.
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी पिस्ता ग्रीन रंग सर्वोत्तम असतो. तुम्ही याच रंगाची राखी भावाला बांधू शकता, ज्यामुळे नशिबाची साथ मिळते.
तुळ: तुळ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी चमकदार निळ्या रंगाचे कपडे घालावेत. भावाला निळ्या रंगाची राखी बांधल्याने नातेसंबंधात मधुरता येते.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. भावाला लाल रंगाची राखी बांधल्याने भावनिक जवळीक वाढते.
धनु: धनु राशीच्या लोकांनी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे. जर तुमच्या भावाची रास धनु असेल, तर त्याला केशरी रंगाची राखी बांधणे शुभ फलदायी ठरते.
मकर: या राशीच्या व्यक्तींनी निळा किंवा काळा रंग परिधान करावा. भावाला निळ्या रंगाची राखी बांधल्याने नातेसंबंधात सकारात्मकता टिकून राहते.
कुंभ: कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही निळा रंग अनुकूल मानला जातो. भावाला निळ्या रंगाची राखी बांधणे शुभ फळ देते.
मीन: मीन राशीसाठी हळदीचा किंवा पिवळा रंग वस्त्र आणि राखीसाठी सर्वात शुभ मानला जातो. यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम आणि सलोखा वाढतो.
रक्षाबंधनाचा हा पवित्र सण राशीनुसार रंगांची निवड करून अधिक विशेष बनवा आणि तुमच्या भाऊ-बहिणीच्या नात्याला आणखी दृढ करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.