Chandra Gochar 2026: घरातील कटकटी मिटणार, शांतता नांदणार! चंद्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; प्रमोशनसह नवीन प्रॉपर्टी खरेदीचा योग

Moon Transit In Sagittarius June 2026 Effects: ज्योतिष शास्त्रात चंद्र गोचरला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चंद्र देवाने आज म्हणजेच 29 जून 2026 रोजी रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश केला.
Chandra Gochar 2026
Chandra Gochar Dainik Gomantak
Published on
Updated on

Moon Transit In Sagittarius June 2026 Effects: ज्योतिष शास्त्रात चंद्र गोचरला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चंद्र देवाने आज म्हणजेच 29 जून 2026 रोजी रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश केला. आता 1 जुलैच्या दुपारी 1 वाजून 31 मिनिटांपर्यंत चंद्र ग्रह याच राशीत विराजमान राहणार आहे. ग्रहांच्या या बदलामुळे सर्वच राशींच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. परंतु, चंद्राच्या या राशी परिवर्तनामुळे अशा 5 भाग्यवान राशी आहेत, ज्यांच्या जातकांना आजपासून मोठा आर्थिक लाभ आणि भाग्याची भक्कम साथ मिळण्याचे संकेत आहेत.

या गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या कामांना कमालीची गती मिळेल आणि मन प्रसन्न राहील. जर या राशीचे आई-वडिल गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलांमुळे चिंतेत असतील, तर आता त्या समस्येचे निवारण होईल आणि घरातील वातावरण आनंदी बनेल. कर्क राशीच्या जातकांसाठीही हा काळ वरदान ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या महत्त्वाच्या कार्यात मोठे यश मिळेल आणि मुलांची चिंता मिटेल. आरोग्याच्या दृष्टीने गळ्याच्या जुन्या समस्येपासून आराम मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक लाभ होईल.

Chandra Gochar 2026
Horoscope: सोमवारी माता लक्ष्मीची विशेष कृपा! ज्येष्ठ पौर्णिमेला 'या' राशींसाठी धनलाभ, प्रमोशन आणि यशाचे संकेत

वृश्चिक राशीच्या सिंगल लोकांना त्यांच्या संयमाचे गोड फळ मिळणार आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, तिच्याशीच घरच्यांच्या संमतीने तुमचा विवाह निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याने आर्थिक टंचाई दूर होईल. धनु राशीच्या लोकांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाल्यामुळे कार्यालयात त्यांची प्रतिमा सुधारेल आणि पदोन्नतीचे (Promotion) योग येतील. या काळात तुम्हाला मनपसंत मालमत्तेत किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी मिळेल, तसेच लव्ह लाईफमधील वाद संपतील.

Chandra Gochar 2026
Horoscope: रविवार ठरेल लकी डे! 'या' राशींच्या उत्पन्नात वाढ, करिअरमध्ये मिळणार मोठी संधी; प्रत्येक कामात मिळणार यश

शेवटची भाग्यवान राशी म्हणजे मीन. या राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांसाठी नवीन योजनांवर काम करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. या गोचरच्या प्रभावामुळे तुम्ही केवळ करिअरमध्ये प्रगती करणार नाही, तर तुमच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ होईल. प्रेम जीवनात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील. एकंदरीत, चंद्राचे हे धनु राशीतील भ्रमण या पाच राशींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com