

Mangal Gochar Negative Effects: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे सेनापती मानले गेलेले 'मंगळ देव' येत्या 21 जून 2026 रोजी मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. हा महत्त्वपूर्ण बदल 21 जून रोजी पहाटे 12 वाजून 7 मिनिटांनी होणार आहे. मंगळ हा अग्नी तत्वाचा कारक ग्रह मानला जात असल्यामुळे त्याचे हे राशी परिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार मंगळाचे हे गोचर काही राशींच्या जातकांसाठी आर्थिक आणि शारीरिक दृष्टीने अजिबात अनुकूल असणार नाही. या काळात काही राशींच्या व्यक्तींना विविध प्रकारच्या मानसिक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मंगळाच्या या अशुभ प्रभावामुळे प्रामुख्याने 3 राशींच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
या बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणारी पहिली रास म्हणजे 'सिंह रास'. सिंह राशीच्या जातकांना या काळात पैशांची अत्यंत गरज असताना वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय शेजाऱ्यांशी विनाकारण वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. या गोचर काळात तुमची एखादी अत्यंत प्रिय किंवा मौल्यवान वस्तू हरवू शकते, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. बोलण्यावरील नियंत्रण सुटल्याने तुमच्याकडून जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे मानसिक शांतता लाभणे कठीण होईल.
दुसरी प्रभावित होणारी रास म्हणजे 'धनु रास'. या गोचर काळात धनु राशीच्या जातकांची एखादी जुनी किंवा मोठी चूक कुटुंबातील सदस्यांसमोर येऊ शकते. यामुळे केवळ तुमच्या मान-सन्मानालाच ठेच पोहोचणार नाही, तर कौटुंबिक नातेसंबंधांवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आर्थिक आघाडीवर अपेक्षेपेक्षा जास्त घसरण जाणवेल, म्हणजेच नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. या काळात केलेले प्रवास फारसे यशस्वी ठरणार नाहीत, त्यामुळे प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे.
तिसरी प्रभावित होणारी रास म्हणजे 'कुंभ रास'. कुंभ राशीच्या लोकांसाठी या काळात लांब पल्ल्याचा प्रवास करणे आरोग्याच्या (Health) दृष्टीने हानिकारक ठरु शकते. या काळात तुम्ही बहुतांश वेळ चिंतेत व्यतीत कराल, ज्यामुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे. स्वभावातील या बदलामुळे इतरांशी वाद होण्याची शक्यता बळावेल. जर तुमच्या घरात नूतनीकरण किंवा दुरुस्तीचे काम सुरु असेल, तर त्याला विलंब होऊ शकतो. नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना या काळात पैशांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागू शकतो. मंगळाचा हा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हनुमानाची आराधना करणे आणि धीर धरुन निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.