Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

Mars Transit Pushya Nakshatra 2026 Predictions: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या नक्षत्रातील बदलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते.
Mangal Gochar 2026
Mangal Gochar Dainik Gomantak
Published on
Updated on

Mars Transit Pushya Nakshatra 2026 Predictions: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या नक्षत्रातील बदलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. येत्या 24 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह 'पुष्य' नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुष्य नक्षत्र हे शनि देवाच्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे शनीच्या नक्षत्रात मंगळाचा हा प्रवेश अनेक राशींसाठी अत्यंत फलदायी आणि समृद्धी आणणारा ठरणार आहे.

विशेषतः मेष, सिंह, धनु आणि मकर या चार राशींच्या जातकांना या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा आर्थिक लाभ, कारकिर्दीत प्रगती आणि भाग्याची भक्कम साथ मिळण्याचे उत्तम योग निर्माण होत आहेत.

Mangal Gochar 2026
Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रडखडलेली किंवा अडकलेली महत्त्वाची कामे आता वेगाने पूर्ण होतील. धन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच व्यापाऱ्यांसाठी हा काळ व्यवसायात उत्तम वृद्धी आणणारा ठरेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

Mangal Gochar 2026
Horoscope: पुत्रदा एकादशीचा दिवस ठरणार खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, धनलाभासह सुख-समृद्धीचे संकेत; रखडलेली कामेही होतील पूर्ण

दुसरीकडे, सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर प्रगतीचे नवे दालन उघडणारे ठरेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीतही हे गोचर सकारात्मक परिणाम घेऊन येईल.

Mangal Gochar 2026
Horoscope 19 Aug 2026: बुधवार ठरणार 'या' 5 राशींसाठी खास! पैशांचा होणार पाऊस; गुंतवणुकीतूनही तगडा फायदा मिळण्याचा योग

धनु राशीच्या जातकांसाठी मंगळाचा पुष्य नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरेल. नोकरीपेशा लोकांना पदोन्नती (Promotion) आणि वेतनवाढीची गोड बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ सुवर्णकाळासारखा सिद्ध होऊ शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळण्यासोबतच नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.

Mangal Gochar 2026
Horoscope 12 August 2026: बुधवार ठरणार अत्यंत महत्त्वाचा! 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; लागणार बंपर जॅकपॉट

मकर राशीच्या लोकांनी या काळात केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात मोठा आर्थिक फायदा होईल. एकंदरीत, मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन या चारही राशींच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवी पहाट घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com