Mangal Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् अचानक धनलाभ! 2 ऑगस्टला ग्रहांचा सेनापती बदलणार चाल; 'या' राशींना करणार मालामाल

Mangal Gochar 2 August 2026: नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा ऊर्जा, साहस आणि पराक्रमाचा कारक 'मंगळ ग्रह' लवकरच आपली राशी बदलणार आहे.
Mangal Gochar 2 August 2026
Mangal Gochar 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Mangal Gochar 2 August 2026: नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा ऊर्जा, साहस आणि पराक्रमाचा कारक 'मंगळ ग्रह' लवकरच आपली राशी बदलणार आहे. सध्या वृषभ राशीत विराजमान असलेला हा महत्त्वाचा ग्रह रविवारी (2 ऑगस्ट) रात्री 10 वाजून 59 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाचे हे गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून, यामुळे अनेक राशींच्या व्यक्तींमध्ये साहस, आत्मविश्वास आणि पराक्रमाची कमालीची वाढ होणार आहे.

या बदलाचा सकारात्मक प्रभाव सर्वच राशींवर कमी-अधिक प्रमाणात दिसून येईल, परंतु तीन विशिष्ट राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान, आर्थिक समृद्धी आणि प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे.

Mangal Gochar 2 August 2026
Horoscope: कालसर्प योगामुळे वाढू शकतात अडचणी; पण शनिदेवाच्या आशीर्वादाने 'या' राशींना मिळणार मोठे यश

या गोचराचा सर्वाधिक आणि थेट लाभ मिथुन राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे, कारण मंगळ ग्रहाचा हा प्रवेश थेट त्यांच्याच राशीत होत आहे. या काळात मिथुन राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील आणि नोकरी किंवा व्यवसायात मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. या सुवर्णकाळात तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

Mangal Gochar 2 August 2026
Horoscope: गुप्त नवरात्रीची शुभ सुरुवात! 'या' 3 राशींवर दुर्गामातेची विशेष कृपा, करिअर, पैसा आणि प्रेमात नशीब उजळणार

दुसरी भाग्यवान रास म्हणजे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर करिअरच्या दृष्टीने अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची चिन्हे आहेत, तर व्यावसायिकांना एखादी मोठी डील फायनल झाल्यामुळे प्रचंड नफा मिळणे निश्चित आहे. या काळात वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तसेच कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल.

Mangal Gochar 2 August 2026
Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

तिसरी लाभधारक रास म्हणजे मकर. मकर राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे राशी परिवर्तन अत्यंत शुभ फल देणारे ठरेल. करिअरच्या (Career) आघाडीवर तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील, परंतु तुमच्या अथक मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ फायदेशीर असून, तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. या काळात कुटुंबासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण ठेवणे फायद्याचे ठरेल, तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नामांकित कंपन्यांकडून चांगल्या ऑफर्स मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत, मंगळाचे हे गोचर या तीनही राशींच्या प्रगतीला नवी गती देणारे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com