Mangal Gochar 2026: 12 ऑगस्टचा दिवस ठरणार खरा 'गेम चेंजर'! 5 राशींना मिळणार कष्टाचे दुप्पट फळ; करिअर आणि व्यवसायात होणार मोठा धमाका

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026: वैदिक ज्योतिषात मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती मानले जाते.
Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Mangal GocharDainik Gomantak
Published on
Updated on

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026: वैदिक ज्योतिषात मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती मानले जाते. साहस, ऊर्जा, पराक्रम, भूमी, नेतृत्व क्षमता आणि निर्णय क्षमतेचा कारक असलेला मंगळ जेव्हा जेव्हा आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर आणि जगभरावर पडतो. द्रिक पंचांगानुसार, 12 ऑगस्ट रोजी मंगळ ग्रह मृगशिरा नक्षत्रातून बाहेर पडून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. भगवान शिवाच्या रुद्र रुपाशी संबंधित असलेल्या आर्द्रा नक्षत्रातील मंगळाचे हे गोचर अत्यंत विशेष मानले जात आहे.

या बदलामुळे रिअल इस्टेट, संरक्षण क्षेत्र, पोलिस, क्रीडा, स्टार्टअप आणि तांत्रिक क्षेत्रात यशाच्या अनेक संधी निर्माण होतील. मंगळाच्या या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार असला, तरी 5 विशेष राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि समृद्धी आणणारा ठरेल.

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी Good News! 'या' राशींचे नशीब उजळणार, करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभाचे नवे मार्ग खुलणार

मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर नवीन संधी घेऊन येत आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याचे उत्तम मार्ग मोकळे होतील आणि कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्याने एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे सोपवला जाऊ शकतो. व्यवसायात नवीन सौदे पूर्ण होतील आणि मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊन लव्ह लाईफ आणि कौटुंबिक वातावरणात दृढता येईल.

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर रखडलेली कामे मार्गी लावणारे ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आकर्षक ऑफर्स मिळू शकतात. विशेषतः तंत्रज्ञान, मीडिया आणि स्टार्टअप क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठा फायदा होईल. भूतकाळातील ओळखींचा वापर करुन व्यवसायात आर्थिक नफा मिळवता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल.

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Horoscope: मंगळवार ठरणार शुभ! बजरंगबलीच्या कृपेने 'या' राशींना यश, धनलाभ आणि आनंदवार्ता मिळण्याचे संकेत

सिंह राशीसाठी हे गोचर यश आणि प्रगतीची नवी दिशा दाखवणारे ठरेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन ओळख मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यावसायिक विस्ताराच्या योजना यशस्वी होतील आणि नवीन गुंतवणुकीतून (Investment) चांगला परतावा मिळेल. सरकारी किंवा कोर्ट-कचेरीच्या कामात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोबल उंचावेल.

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे नक्षत्र गोचर प्रचंड प्रभावशाली सिद्ध होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधकही तुमची क्षमता मान्य करतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक चणचण दूर होईल. रिअल इस्टेट, पोलिस, डिफेन्स आणि टेक्निकल फिल्डमधील लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. आरोग्य सुधारेल आणि आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल.

Mangal Nakshatra Gochar 12 August 2026
Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

मकर राशीच्या जातकांसाठी हे गोचर मेहनतीचे योग्य फळ देणारे ठरेल. बऱ्याच काळापासून ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होतात, ती अखेर चालून येईल. बँकिंग, फायनान्स आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना मुलाखती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन क्लायंट्स जोडले गेल्याने उत्पन्नात वाढ होईल आणि भविष्यातील योजना राबवण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com