Mangal Gochar 2026: मंगळ-राहु गोचर घडवणार चमत्कार! 3 राशींच्या घरात नांदणार अफाट सुख-समृद्धी; पैशांची होणार बरसात

Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहु मानला जातो. त्यामुळे मंगळाचा राहुच्या नक्षत्रातील हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरणार आहे.
Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits
Mangal Gochar Dainik Gomantak
Published on
Updated on

Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या नक्षत्र बदलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यानुसार, शौर्य आणि पराक्रमाचा कारक असलेला मंगळ ग्रह आज (12 ऑगस्ट) रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यापूर्वी 24 जुलै रोजी मंगळाने मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला होता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी राहु मानला जातो. त्यामुळे मंगळाचा राहुच्या नक्षत्रातील हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी ठरणार आहे.

मंगळ ग्रह या नक्षत्रात 2 सप्टेंबरपर्यंत राहणार असून, त्यानंतर तो पुनर्वसु नक्षत्रात गोचर करेल. मंगळाच्या या नक्षत्र बदलामुळे सर्वच राशींवर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडणार असला, तरी कन्या, तुळ आणि मीन या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ प्रचंड भाग्याचा आणि प्रगतीचा ठरणार आहे.

Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits
Horoscope 12 August 2026: बुधवार ठरणार अत्यंत महत्त्वाचा! 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; लागणार बंपर जॅकपॉट

कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर अत्यंत शुभ फलदायी ठरेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रेंगाळलेले किंवा अडकलेले कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आर्थिक आघाडीवर तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता असून, नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे आणि पूर्ण नियोजनासह काम करावे.

Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits
Horoscope: सिद्धी योग अन् पुष्य नक्षत्राचा महासंयोग; मंगळवारी 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा; व्यवसाय, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत मिळणार लाभ

तुळ राशीच्या व्यक्तींना या काळात करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक सुवर्णसंधी चालून येतील. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती (Promotion) आणि पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता असून, यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. जे तरुण बऱ्याच दिवसांपासून नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात यश मिळू शकते, तसेच व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल.

Mangal Gochar Rahu Nakshatra Benefits
Horoscope: मंगळवारी कर्क, सिंहसह 'या' 4 राशींना धनलाभाचे प्रबळ संकेत; मंगळागौरीच्या दिवशी शुभ योगांचा विशेष प्रभाव

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचा आर्द्रा नक्षत्रातील प्रवेश आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा पाहायला मिळेल आणि अनपेक्षित मार्गानी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळू शकतो. एकूणच, मंगळाचा हा नक्षत्र बदल या तीन राशींच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com