Chandra Grahan 2025 Sutak Time: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला; जाणून घ्या ग्रहण आणि सूतक काळाची वेळ व नियम

Lunar Eclipse 2025: धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून या ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण आणि सूतक काळाचे नियम पाळणे आवश्यक मानले जाते.
Chandra Grahan 2025 Sutak Time
Lunar Eclipse 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Chandra Grahan 2025 Sutak Time: वर्षातील (2025) शेवटचे चंद्रग्रहण येत्या 7 सप्टेंबर रोजी लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण एक पूर्ण चंद्रग्रहण असणार असून ते संपूर्ण देशात दिसणार आहे. त्यामुळे, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून या ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या काळात ग्रहण आणि सूतक काळाचे नियम पाळणे गरजेचे मानले जाते. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 30 मिनिटांचा असेल, तर पूर्ण चंद्रग्रहणाचा वेळ 1 तास 22 मिनिटांचा असेल.

ग्रहण आणि सूतक काळाची वेळ

  • ग्रहण सुरु होण्याची वेळ: 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटे.

  • पूर्ण चंद्रग्रहणाची वेळ: रात्री 11 वाजून 1 मिनिटे ते रात्री 12 वाजून 23 मिनिटे.

  • सूतक काळाची वेळ: चंद्रग्रहणाचे सूतक ग्रहण सुरु होण्याच्या 9 तास आधी सुरु होते. त्यामुळे सूतक काळ 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी सुरु होईल.

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे त्याचे सूतक काळ भारतातील नागरिकांसाठी लागू असेल. सूतक काळ सुरु झाल्यावर मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि कोणताही शुभ किंवा धार्मिक विधी केला जात नाही.

Chandra Grahan 2025 Sutak Time
Astro Tips: वाढतं वय अन् लग्न जुळता जुळेना! जाणून घ्या यामागील ज्योतिषशास्त्रीय कारणे

सूतक काळातील महत्त्वाचे नियम

ज्योतिष शास्त्रानुसार, सूतक काळादरम्यान काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:

  • सूतक काळात देव-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करु नये.

  • या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे.

  • गरोदर महिलांनी सूतक काळात घराबाहेर पडू नये.

  • सूतक काळात केस आणि नखे कापणे वर्जित आहे.

  • या काळात खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये तुळशीची पाने किंवा दूर्वा टाकणे शुभ मानले जाते.

  • ग्रहणकाळात खाणे-पिणे टाळावे.

  • सूतक काळात आणि ग्रहण काळात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करुन मंत्रांचा जप करावा.

Chandra Grahan 2025 Sutak Time
Astro Tips: पुजा करताना जांभई देणे शुभ की अशुभ? अशा लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

ग्रहणानंतरचे विधी

ग्रहण संपल्यावर काही गोष्टी करणे आवश्यक मानले जाते:

  • ग्रहण संपल्यावर लगेचच स्नान करावे.

  • घर आणि मंदिराची पूर्णपणे स्वच्छता करावी.

  • गरिबांना आणि गरजूंना दान-धर्म करावा.

या चंद्रग्रहणाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्यामुळे नियमांचे पालन केल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात, असे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com