Guru Gochar 2026: 31 ऑक्टोबरला गुरुचं 'महागोचर'! 5 राशींचं नशीब रातोरात पालटणार; बँक बॅलन्समध्ये होणार तगडी वाढ

Leo Horoscope Jupiter Gochar: गुरु ग्रह कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे हे गोचर शनिवारी (31 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी होईल.
Leo Horoscope Jupiter Gochar
Guru Gochar Danik Gomantak
Published on
Updated on

Guru Gochar 2026: गुरु ग्रह कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे हे गोचर शनिवारी (31 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी होईल. ज्योतिषशास्त्रात देवगुरु बृहस्पतींना ज्ञान, शिक्षण, विवाह आणि भाग्याचा कारक मानले जाते. गुरु ग्रहाच्या या राशी बदलामुळे म्हणजेच 31 ऑक्टोबरपासून अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो. गुरुच्या या गोचरमुळे विशेषतः मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु या राशींच्या जातकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या राशींवर होणाऱ्या शुभ परिणामांबद्दल:

मेष रास: गुरुचे सिंह राशीत होणारे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरु शकते. तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. ऑफिसमध्ये कामाची नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यापाऱ्यांना उत्तम नफा होईल आणि एखादी मोठी डील फायनल झाल्यामुळे मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमची प्रलंबित असलेली सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

कर्क रास: कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे भ्रमण आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम राहील. पैशाच्या बाबतीत तुम्हाला मोठे यश मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. कमाईचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुमच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील.

Leo Horoscope Jupiter Gochar
Horoscope: गुरुवारचा दिवस 'या' राशींसाठी वरदान! धनलाभासह करिअरमध्ये प्रगती, मोठे निर्णय ठरणार फायदेशीर; रखडलेली कामं पूर्ण होणार

सिंह रास: गुरुचे गोचर सिंह राशीतच होणार आहे, त्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम मिळतील. नोकरदार वर्ग आणि व्यापारी या दोघांसाठीही हा काळ सुवर्णकाळ ठरेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा फायदा करुन देऊ शकते.

वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या जातकांना करिअरमध्ये (Career) प्रचंड यश आणि लाभ मिळू शकतो. गुरुचे गोचर तुमच्यासाठी भाग्योदयाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होऊन नफा होईल. जे लोक सातत्याने मेहनत करत आहेत, त्यांना त्यांचे अत्यंत शुभ फळ मिळेल.

Leo Horoscope Jupiter Gochar
Horoscope 19 Aug 2026: बुधवार ठरणार 'या' 5 राशींसाठी खास! पैशांचा होणार पाऊस; गुंतवणुकीतूनही तगडा फायदा मिळण्याचा योग

धनु रास: धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जात आहे. तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रात मोठे लाभ होतील. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, बँक बॅलन्स वाढेल आणि मन अत्यंत प्रसन्न राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com