
Which Zodiac Signs Are Lucky: रविवार, ३१ ऑगस्ट रोजी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असल्याने हा दिवस राधाष्टमी म्हणून साजरा केला जातोय याच दिवशी काही ठिकाणी लक्ष्मी व्रताची सुरुवात देखील केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत असेल आणि सूर्य व बुध यांच्यासोबत केंद्र योग तयार करतोय. याशिवाय, सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग आणि आदित्य योग असे दोन शुभ योग तयार होत आहेत. याच दिवशी वसुमान आणि चंद्राधि योग देखील जुळून येत आहेत, ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरतोय. या शुभ योगांमुळे वृषभ, मिथुन, वृश्चिक, कुंभ आणि मीन या ५ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.
वृषभ रास: तुमच्यासाठी रविवारचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तुमच्या आर्थिक नियोजनाचा तुम्हाला फायदा होईल.
भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती झाल्याने मन आनंदी राहील. कपडे आणि इतर सुख-सुविधा मिळवण्याचे योग आहेत. अनपेक्षित स्रोतांकडूनही धनलाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. जे लोक प्रॉपर्टीच्या व्यवसायात आहेत त्यांना एखादी चांगली डील मिळू शकते.
मिथुन रास: हा दिवस कामात व्यस्त असला तरी मान-सन्मान वाढवणारा असेल. काही नवीन संपर्क तयार होतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना बनवू शकता. आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चांगल्या नियोजनाने तुम्ही आर्थिक योजनांमध्ये यशस्वी व्हाल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुमचा प्रभाव वाढेल.
वृश्चिक रास: तुमच्यासाठी रविवारचा दिवस लाभदायक ठरेल. केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही काही रचनात्मक किंवा कलात्मक काम करू शकता. कला आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ आणि सन्मान मिळण्याची संधी मिळेल. तुमचे प्रेमजीवन चांगले राहील. तुम्हाला एखादे गिफ्ट मिळू शकते. तुमची एखादी रखडलेली योजना पुन्हा सुरू होऊ शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्र किंवा नातेवाईकाला भेटून तुम्हाला आनंद होईल. विशेषतः, इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल.
कुंभ रास: तुम्ही एखादे धाडसी काम करू शकता. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना एखादी मोठी संधी मिळू शकते. धनसंचय करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मनातील कोणताही गुंता सुटल्याने तुम्हाला एक प्रकारचा दिलासा मिळेल. प्रेमजीवन आनंददायक राहील. घरातून तुम्हाला एखादे सरप्राईज मिळू शकते. तुमच्या व्यवसायात चांगली कमाई होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.