Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

Guru Mangal Yuti 18 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात देवांचे गुरु बृहस्पती आणि ग्रहांचे सेनापती मानल्या जाणाऱ्या मंगळाच्या युतीला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते.
Guru Mangal Yuti 18 September 2026
Guru Mangal YutiDainik Gomatak
Published on
Updated on

Guru Mangal Yuti 18 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात देवांचे गुरु बृहस्पती आणि ग्रहांचे सेनापती मानल्या जाणाऱ्या मंगळाच्या युतीला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. या संयोगाला 'गुरु-मंगळ योग' किंवा 'गुरु-सेनापती योग' म्हणून ओळखले जाते. दृक पंचांगानुसार, येत्या 18 सप्टेंबर रोजी ही खगोलीय आणि ज्योतिषीय घटना घडून येणार आहे. या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे गुरु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे.

ज्योतिषाचार्यांच्या मते, कर्क राशीतील ही युती विशेष फलदायी ठरणार आहे, कारण कर्क राशीत गुरु उच्च स्थानी तर मंगळ नीच स्थानी असतो. यामुळे मंगळाचा 'नीचभंग राजयोग' निर्माण होत आहे. ज्ञान आणि पराक्रमाच्या या अनोख्या मिलनामुळे थोड्या प्रयत्नांतही मोठी कामे फत्ते होतील आणि नशिबाची उत्तम साथ लाभेल. या महायोगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जातकांवर दिसून येईल. मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ असल्याने हा काळ त्यांच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीची स्वप्ने पूर्ण होतील. कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल आणि घरात मांगलिक कार्याचे नियोजन होईल. नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

Guru Mangal Yuti 18 September 2026
Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

कर्क राशीमध्येच ही युती होत असल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय असेल. आत्मविश्वासात वाढ होऊन नेतृत्वगुण उंचावतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याची किंवा नोकरी बदलण्याची इच्छा असणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील. मानसिक तणाव दूर होऊन समाजात प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. तुळ राशीच्या जातकांसाठी हा महासंगम करिअरमध्ये (Career) प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येईल. प्रदीर्घ काळापासून अडकलेले प्रोजेक्ट्स किंवा फायली मार्गी लागतील. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. एवढेच नव्हे तर अडकलेला किंवा बुडालेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत.

Guru Mangal Yuti 18 September 2026
Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

कन्या राशीच्या जातकांसाठी गुरु-मंगळ युती उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करेल. अचानक धनलाभ आणि पैतृक संपत्तीतून मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी एखादी मोठी डील आर्थिक घडी मजबूत करेल आणि कुटुंबाच्या सहकार्याने प्रदीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com