मंगळवार, १ आक्टोबर २०२४, भाद्रपद कृष्ण पक्ष.
तिथि- चतुर्दशी २१l३८ पर्यंत.
रास-सिंह १६|०१
नक्षत्र- पूर्वाफाल्गुनी
योग - शुक्ल
करण - विष्टी
दिनविशेष - चतुर्दशी वर्ज्य
मेष
प्रयत्ने फळास येतील. वाहन सुख मिळेल, मित्रमंडळी भेटण्याची संभावना, खर्च जपून करा तसेच वाहन संदर्भात थोडक्यात अडचणी संभवतील.
वृषभ
प्रसन्नतास्वरूपी घटना घडतील, अभ्यासात आनंद मिळेल, नोकरी संदर्भात बाहेर गावी जाण्याची संधी किंवा यात्रा करण्याचा विचार येईल. कुठे फिरायला जाण्याची इच्छा होत असल्यास निश्चित जावे. त्यातून निर्णय घेण्याची ऊर्जा प्राप्त होईल.
मिथून
कदाचित आपल्या मनात दुहेरी विचार संचार करीत आहेत, योग्य निर्णय घ्यावा.अधिक लोकांना विचारपूस करण्याची आवश्यकता नाही.आपले अंत:करण म्हणते तेच करण्याचा प्रयत्न करा. कार्य निश्चितच सफल होईल. शक्यतो मौन धारण करावे.
कर्क
आपण सर्व ठिकाणी मनातुन कार्य करता हा उत्तम स्वभाव आहे परंतु समोरील व्यक्तीचे आपण परीक्षण करीत नाहीत त्यामुळे सावधानता बाळगा फसवणुक होण्याची संभावना दिसते, कुठेही मैत्री करताना किंवा विशेष कार्य करताना पूर्वपरीक्षण करा मगच निर्णय घ्या.
सिंह
कोणतेही काम केले तरी त्याचे फल उशिरा मिळत असेल तरी निश्चित योग्य मिळेल हा विश्वास असावा.आरोग्याची काळजी घ्यावी या संदर्भात तक्रारी येतील असे दिसते, मानसिक स्थिती सांभाळावी,कार्य होणार हा विश्वास ठेवल्यास प्रसन्नता वाढेल.
कन्या
थोडासा आळस वाढत असेल तर तो अंमलात आणावा, आपले बौध्दीक दृष्ट्या उत्तम कार्य सुरू आहे, आरोग्य संदर्भात अडचणी येण्याची संभावना आहे,योग तथा नियमित व्यायाम करावा,अधिकार पदासाठी यत्न करत असाल्यास काही काळ वाट पाहावी यश प्रगती दूर नाही.
तूळ
सुंदर तथा सुगंधी वस्तू खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. बंधू - भगिनी यांच्याकडून विशेष लाभ होईल, कुटुंबातील लोकांशी भेट होईल.धनलाभ होण्याची संभावना आहे,आनंददायी दिवस असेल,छान खरेदी होईल. दूरचा प्रवास करू नये.
वृश्चिक
जवळचे प्रवास संभवतील, शेजाऱ्यांकडून सावध राहावे, वादविवाद होण्याची संभावना दिसते, व्यवसाय नोकरीसाठी बदलाचे विचार येतील परंतु बदलीचा निर्णय घेऊ नये, काही काळ थांबावे व मग योग्य निर्णय घ्यावा.
धनु
उत्तम गृहसौख्य लाभेल, अपेक्षित प्रेम मिळेल,आईची उत्तम सेवा करावी, यश दूर नाहीच.घरासाठी केलेले प्रयत्न फळास येतील. एकटेपणा वाटून घेऊ नये, नातेवाईकांचा अपेक्षित सपोर्ट मिळेल,दूरचे प्रवास टाळावेत, धनसंप्पत्तीचा अधिक विचार नसावा.
मकर
अभ्यासासाठी कष्ट करावे लागतील,केलेल्या कर्माचे फल वाया जाण्याची शक्यता असल्याने महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नये. प्रवासाची कामे होतील, यात्रा असल्यास उत्तम प्रकारे होईल. व्यावहारिक कामे टाळावीत,नोकरी संदर्भातील कामे होतील.
कुंभ
आरोग्य सांभाळावे,दवाखाना होण्याची संभावना. नोकरी संदर्भात कोणतेही नवीन निर्णय घेऊ नये, मेडिकल संदर्भात किंवा शेती संबंधातील कामे होतील, शत्रूंपासून सावधान राहावे, फसवणुक होण्याची शक्यता दिसते,खर्च सांभाळून करावा.
मीन
आपले प्रेम सफल होण्याची शक्यता आहे, केवळ कोणत्याही विषयासंदर्भात अतिशोक्तीपूर्ण कार्य करण्यास जाऊ नये अन्यथा नुकसान संभवेल. वाहने सावकाश चालवा.शक्यतो दूरचे प्रवास टाळा.
(ज्योतिषाचार्य: श्री. सारंग चिक्षे )
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.