Horoscope May 2026: व्यापार-करिअरमध्ये मिथुन राशीची चांदीच चांदी! मे महिन्याची सुरुवात सुवर्णकाळ; सूर्याच्या कृपेने होणार भाग्योदय

Gemini Horoscope May 2026: महिन्याच्या पहिल्या भागात मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास शिखरावर असेल. यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
Mithun Rashi Bhavishya May 2026
Gemini Horoscope May 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Mithun Rashi Bhavishya May 2026: मे महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र स्वरुपाचे फळ देणारा ठरणार आहे. विशेषतः मे महिन्याच्या मध्यापर्यंत सूर्यदेवांची कृपा तुमच्यावर राहणार असून त्यानंतरच्या काळात काही अंशी सावध राहण्याची गरज ज्योतिषशास्त्राने वर्तवली. 15 मे पर्यंत सूर्य तुमच्या कुंडलीतील अकराव्या भावात विराजमान असल्याने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतीचा सिद्ध होईल.

महिन्याच्या पहिल्या भागात मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास शिखरावर असेल. यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे या काळात मार्गी लागतील आणि नशिबाची साथ मिळाल्याने लाभाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक दृष्टीकोनातून विचार केल्यास, 15 मे पर्यंत उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल, तसेच व्यापार-उद्योगातही समाधानकारक नफा प्राप्त होईल. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि समाजात मान-सन्मानाची वृद्धी होईल.

Mithun Rashi Bhavishya May 2026
Horoscope 6 May 2026: बुधवारचा दिवस 4 राशींसाठी 'गोल्डन डे'! गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा, नशिबाची लाभणार साथ; आर्थिक लाभासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल

शुक्र ग्रहाच्या सकारात्मक प्रभावामुळे या महिन्यात तुम्हाला विविध सुख-सुविधांचा लाभ मिळेल. मात्र, शनिदेवांच्या स्थितीमुळे तुम्हाला काही बाबतीत संमिश्र परिणाम भोगावे लागू शकतात. राहूचे फळ मध्यम स्वरुपाचे राहणार असले तरी, खरी काळजी 15 मे नंतर घेणे गरजेचे आहे. 15 मे नंतर सूर्याचे राशी परिवर्तन आणि कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत झाल्यामुळे काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा गुंतवणूक (Investment) करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com