

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या नक्षत्रांच्या हालचालीवरून आपल्या दैनंदिन जीवनातील चढ-उतारांचा अंदाज लावला जातो. १२ एप्रिल, रविवार असून हा दिवस प्रामुख्याने सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवासोबतच भगवान विष्णू, माता दुर्गा आणि भैरवनाथांच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. १२ एप्रिलचा हा दिवस काही राशींसाठी सुखाचे दिवस घेऊन येईल, तर काहींना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकतो. मनात अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्या जुन्या सवयी सोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकते. तर मिथुन राशीच्या जातकांनी उद्या कामाचा अतिरिक्त ताण घेणे टाळावे. आरोग्याची काळजी घेत एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल.
कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य आहे. सिंह राशीच्या जातकांनी उद्या मानसिक शांतता राखणे गरजेचे आहे. व्यवसायासाठी पालकांकडून आर्थिक मदत मिळण्याची चिन्हे आहेत. कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा मंत्र 'आधी काम पूर्ण करा' हा असावा. कामात अति-परफेक्टपणा शोधण्यापेक्षा ते पूर्ण करण्यावर भर दिल्यास यश नक्की मिळेल.
तुळ राशीच्या जातकांनी उद्या स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्याही गोष्टीवर तातडीने प्रतिक्रिया देणे टाळावे. नात्यांमध्ये संवाद वाढवल्यास संबंध अधिक घट्ट होतील. धनु राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस प्रगतीचा आहे. नोकरीत बदलाचे संकेत असून मान-सन्मानात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.
मकर राशीच्या व्यक्तींनी उद्या आपल्या बोलण्यात गोडवा ठेवावा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनी केवळ योजना न आखता त्यांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा. मेहनतीशिवाय यश मिळणे कठीण आहे. शेवटी मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस संमिश्र राहील. मन थोडे अशांत राहू शकते, त्यामुळे संयम पाळा. वाहन सुख मिळेल आणि बौद्धिक कार्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.