Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

2026 Year Most Powerful In Century: ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मतानुसार, 2026 हे शतकभरातील सर्वात शक्तिशाली वर्ष ठरु शकते.
2026 Year Most Powerful In Century
2026 Year Most Powerful In CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

2026 Year Most Powerful In Century: ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मतानुसार, 2026 हे शतकभरातील सर्वात शक्तिशाली वर्ष ठरु शकते. ग्रहांचे दुर्मिळ योग आणि सूर्याची ऊर्जा यामुळे या वर्षात जागतिक आणि वैयक्तिक स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

संख्याशास्त्रज्ञ (Numerologist) आणि अंक ज्योतिष कंपनी 'न्यूम्रोवाणी'चे मुख्य ज्योतिषी सिद्धार्थ एस. कुमार यांच्या मते, अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष 1, 8 आणि 2 या अंकांच्या ऊर्जांनी नियंत्रित असेल. हे अंक अनुक्रमे नेतृत्व, कर्म आणि संतुलन दर्शवतात. या तिन्ही ऊर्जा एकत्र येऊन आपण कसे जगतो, नेतृत्व कसे करतो आणि विशेष म्हणजे इतरांशी कसे जोडले जातो, यात मोठे परिवर्तन घडवतील.

2026 हे वर्ष इतके खास का?

ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 हे वर्ष खूप खास आहे, कारण यावर्षी आकाशात ग्रहांची प्रचंड गर्दी असेल. कुमार सांगतात, "जवळपास 50 दिवस असे असतील, जेव्हा चार किंवा अधिक ग्रह एकाच ठिकाणी येतील, ज्याला 'स्टेलियम्स' (Stelliums) म्हणतात. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी संख्या आहे. जेव्हा इतके ग्रह एकत्र येतात, तेव्हा आपल्या वैयक्तिक जीवनात आणि जागतिक स्तरावर वेगाने बदल घडतात."

2026 Year Most Powerful In Century
Rajyog Astrology: ऑक्टोबरमध्ये नशिबाची मोठी लॉटरी! तीन मोठे राजयोग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा
  • स्थिरतेवर परिणाम: वृषभ राशीतील युरेनस आर्थिक स्थैर्य आणि स्थिरतेवर परिणाम करेल.

  • अध्यात्मिक योग: शनि (Saturn) आणि नेपच्यूनचा (Neptune) मीन राशीतील दुर्मिळ योग भौतिक संरचना आणि अध्यात्मिकता यांचा मेळ घालेल.

  • सत्य आणि न्याय: तसेच, प्लूटोचे शनी-शासित राशीतून होणारे भ्रमण, सत्य, निष्पक्षता आणि उच्च उद्देशांवर आधारित नवीन व्यवस्था तयार करण्यासाठी मानवतेला प्रवृत्त करेल.

सूर्याची सर्वात जास्त ऊर्जा

तज्ञांनुसार, 2026 हे वर्ष शक्तिशाली 'सोलर मॅक्सिमा' (Solar Maxima) या टप्प्याच्या मध्यभागी असेल. हा असा काळ असतो, जेव्हा सूर्य तीव्र चुंबकीय ऊर्जा आणि सौर ज्वाला (Solar Flares) बाहेर टाकतो. कुमार सांगतात, "सूर्याचे सध्याचे चक्र इतिहासातील सर्वात लांब चक्रांपैकी एक आहे. 2020 ते 2030 या काळात सूर्याची ऊर्जा सर्वात जास्त असेल आणि 2026-2027 हा त्याचा केंद्रबिंदू असेल. यामुळे अनेक आव्हाने आणि मोठे शोध (Breakthroughs) समोर येतील."

2026 Year Most Powerful In Century
Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

2026 मध्ये काय बदल दिसू शकतात?

  1. जागतिक नेतृत्वात बदल: सरकारे आणि नेत्यांवर बदलासाठी दबाव येईल. लोक आता अनैतिक नेतृत्व स्वीकारणार नाहीत. 2026 च्या अखेरीस पारदर्शकता आणि नैतिक जबाबदारीकडे वाटचाल अपेक्षित आहे.

  2. तंत्रज्ञानात वाढ, एलियन संपर्क: सौर क्रियेमुळे उपग्रह (Satellites) आणि दळणवळण (Communication) प्रणाली विस्कळीत होऊ शकतात, परंतु यामुळे नवनिर्मितीलाही प्रोत्साहन मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), अक्षय ऊर्जा (Renewable Energy) आणि इतर जीवसृष्टीशी संपर्क होण्यासारखी मोठी प्रगती दिसू शकते.

  3. निसर्गाचा इशारा (Earthquakes, Fires): भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात. पृथ्वी संतुलन साधायला सांगत आहे, म्हणून मानवाने हवामान बदलाची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी, असा हा इशारा असेल.

2026 Year Most Powerful In Century
Health Astrology: आरोग्य सुधारणार! वृश्चिक, मीन, धनु आणि मेष राशीसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक; वाचा तुमचं भविष्य काय सांगतं?
  1. अध्यात्मिकतेकडे कल: भौतिक आकर्षणाऐवजी अनेक लोक ध्यान (Meditation), योग आणि ऊर्जा उपचार (Energy Healing) यांसारख्या गोष्टींकडे वळतील. प्राचीन ज्ञान परत येईल, लोक शांततेचा शोध घेतील.

  2. मानव आणि तंत्रज्ञान एकत्र: 2026 हे वर्ष मानव आणि मशीन एकत्र येण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. मानवी आयुष्य वाढवण्याचे नवीन मार्ग आणि शरीरात तंत्रज्ञान समाकलित करण्याबद्दल बातम्या येतील.

  3. प्रवासात सावधगिरी: बुध (Mercury), मंगळ (Mars) आणि राहूचा योग प्रवासात अस्थिरता आणि वेगवान ऊर्जा आणेल. प्रवासात नाविन्य वाढेल, पण अपघातांचा धोकाही वाढेल. तसेच, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे महत्त्वाचे ठरेल.

  4. राजकीय आणि सामाजिक बदल: 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने, सुधारणा आणि सामूहिक चळवळी अपेक्षित आहेत. हे बदल गोंधळलेले वाटू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com