

११ फेब्रुवारी २०२६ हा दिवस सर्व १२ राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता आज काही राशींना आर्थिक लाभाचे संकेत मिळत असताना, काही राशींना आरोग्य व खर्चांबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे होळीनंतर शनी अस्त होणार असल्याने तब्बल ३० वर्षांनंतर काही राशी आणि विशिष्ट क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तवण्यात येत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना आज शिक्षण व करिअरच्या क्षेत्रात प्रगती अनुभवता येईल. नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते. घरातील काही रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.
वृषभ राशीच्या लोकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र जीवनसाथीच्या यशामुळे आनंद मिळेल आणि करिअर बदलाची संधीही चालून येऊ शकते. मिथुन राशीला आज मेहनतीचे फळ मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल.
कर्क राशीच्या लोकांमध्ये उत्साह आणि ऊर्जा दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक आनंदाचे क्षण मिळतील, मात्र व्यवसायात गती मंदावल्याने थोडी चिंता राहील.सिंह राशीने आज कायदेशीर बाबींमध्ये पडणे टाळावे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील सहकार्यामुळे मानसिक दिलासा मिळेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशाचे संकेत आहेत. मात्र आर्थिक व्यवहारात जपून वागणे गरजेचे आहे. तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठीही आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. काहींना नवीन संधी मिळतील, तर काहींना जबाबदाऱ्या वाढल्याचे जाणवेल. सकारात्मक विचार, संयम आणि योग्य निर्णय यामुळेच आजचा दिवस यशस्वी करता येईल, असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.