Goa Assembly Session: येत्या अधिवेशनात 'या' 5 मुद्यांवर युरी आलेमाव मांडणार खाजगी सदस्य ठराव; दखल घेतल्यास चर्चा करणार...

पक्षांतर विरोधी कायदा, एसटीना राजकीय आरक्षण, दुहेरी नागरिकत्व, ओपिनियन पोल आणि विधवा भेदभाव याबाबत खाजगी सदस्य ठराव
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

Goa Assembly Session: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या आठव्या गोवा विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनासाठी पाच खाजगी सदस्य ठराव मांडले आहेत. जर ठराव सभापती रमेश तवडकर यांनी दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. सोडत पद्दतीने निवडलेल्या खासगी ठरावांची यादी 25 जानेवारी 2024 रोजी जारी केली जाईल.

Yuri Alemao
Goa Crime News: कर्नाटकातील तरुणाने भाड्याच्या खोलीत संपवले जीवन; पैंगीणमधील घटना

पक्षांतर विरोधी कायदा

पक्षांतरविरोधी कायद्यातील दुरुस्तीवरील त्यांच्या पहिल्या खाजगी सदस्य ठरावात. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी “विलीनीकरण” ही संकल्पनाच काढून टाकण्याची आणि विधानसभेच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नियुक्त केलेल्या न्यायाधीशाकडे तर संसदेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशानी नियुक्त केलेल्या न्यायमूर्तींकडे पक्षांतरासंबधी प्रकरणांची निर्णय प्रक्रिया सोपवण्याची गरज व्यक्त केली आहे.

एसटीना राजकीय आरक्षण

देशाच्या निवडणूक आयोगाने गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा मतदारसंघ अधिसूचित करावेत यासाठी कायद्यातील सर्व उपलब्ध तरतुदींचा शोध घेऊन सरकारने त्यासंबंधी कारवाई करावी, असे आलेमाव यांनी त्यांच्या दुसऱ्या खाजगी सदस्य ठरावात म्हटले आहे.

दुहेरी नागरिकत्व

दुहेरी नागरिकत्वाबाबतही युरी आलेमाव यांनी ठराव मांडला आहे. सर्व भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया जलद करण्याची आणि त्यादरम्यान ज्या गोमंतकीयांनी आपली पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी केली आहे; पण ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट नाही, अशा सर्वांना ओसीआय दर्जा देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्र सरकारला करण्याची शिफारस केली आहे.

ओपिनियन पोल डे

दरवर्षी 16 जानेवारीला “अस्मिताय दिन – ओपिनियन पोल डे” सरकारी पातळीवर साजरा केला जावा. यासाठी चौथा खाजगी सदस्य ठराव त्यांनी दाखल केला आहे. केवळ ओपिनियन पोलमुळेच आज आपण स्वत:ला गोवा राज्याचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणू शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सदर ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी या ठरावात म्हटले आहे.

विधवा भेदभाव

आपल्या पाचव्या ठरावात आलेमाव यांनी विधवा भेदभाव मुद्दा अधोरेखित केला आहे. विधवा अत्याचार आणि विधवांचे अलगीकरण यावरील त्यांच्या यापूर्वीच्या खाजगी सदस्य ठरावावर चर्चा झाली. मात्र तरीही महिला व बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी युरी यांना आश्वासन देऊनही अपेक्षित कायदा आणण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे परत एकदा त्यांनी ही अन्यायकारक प्रथा रोखण्यासाठी ठराव मांडला आहे.

या ठरावात त्यांनी नाईक-डिचोलकर कुटुंबातील कन्या डॉ. गौतमी व डॉ. प्रथमेश यांचे लग्नविधी करणाऱ्या उषा नाईक यांचा विशेष उल्लेख आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com