Government Policy : धोरण अंमलबजावणीत सरकार फोल : युरी

Government Policy : या धोरणांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची तसेच कलाकार आणि खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्याचीही तरतूद आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Government Policy : मडगाव, सांस्कृतिक धोरण २००७ आणि गोवा क्रीडा धोरण २००९ हे काँग्रेस सरकारने कला आणि संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील स्थानिक प्रतिभावंताना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केले होते.

या धोरणांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची तसेच कलाकार आणि खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्याचीही तरतूद आहे. दुर्दैवाने, २०१२ पासून सत्तेत आलेले भाजप सरकार दोन्ही धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात फोल ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी सरकारी नोकऱ्यांत खेळाडूंसाठी ४ टक्के आरक्षण जाहीर केले. यावर युरी यांनी भाजप सरकारने सांस्कृतिक व क्रीडा धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कलाकार आणि खेळाडूंना त्याचा समान लाभ द्यावा, असे आवाहन केले आहे.

Yuri Alemao
Dance Bar In Goa: कळंगुटमधील बेकायदेशीर डान्सबार तातडीने बंद करा

प्रतिभावंतांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या सरकारच्या याआधीच्या घोषणेची आणि मिस इंडिया डेफ इंटरनॅशनल रनर अप विनिता शिरोडकर हिला दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाचीही युरी यांनी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com