Goa Assembly Session: ‘ओसीआय’बाबत उत्तर देण्‍यास टाळाटाळ; युरी आलेमाव

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नाचे उत्तर १६ जुलै रोजी दिलेले आहे त्यामुळे हा प्रश्‍‍न स्वीकारला नाही असा खुलासा करून हा विषय गुंडाळला
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रश्नाचे उत्तर १६ जुलै रोजी दिलेले आहे त्यामुळे हा प्रश्‍‍न स्वीकारला नाही असा खुलासा करून हा विषय गुंडाळला
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: विदेशस्थ भारतीय नागरिक (ओसीआय) या ओळखपत्रासाठी अर्ज केलेल्या गोमंतकीयांच्या अर्जांची स्थिती, हा प्रश्‍‍न कामकाजात का समाविष्ट केला नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.

ते म्हणाले, गोमंतकीयांसाठी हा प्रश्‍‍न महत्त्‍वाचा असताना सरकार उत्तर देण्याचे का टाळत आहे? सदर प्रश्‍‍न आतारांकित होता. त्याला सरकारला उत्तर देता आले असते. सरकारने हा प्रश्‍‍न अमान्य केला आहे. त्याचे कारण तरी सरकार देणार आहे का?

त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नाचे उत्तर १६ जुलै रोजी दिलेले आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रश्‍‍न स्वीकारला नाही असा खुलासा करून हा विषय गुंडाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com