Bambolim: कुजीरा स्कूल संकुलात राडा; चाकूने विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, एकजण ताब्यात

Bambolim Goa: हल्ला करणारा तरुण बाहेरचा असल्याची माहिती समोर आली असून, आगशी पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
Bambolim Goa
Bambolim Goa

Bambolim Goa

बांबोळीतील कुजीरा शिक्षण संकुलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संकुलात विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणारा तरुण बाहेरचा असल्याची माहिती समोर आली असून, आगशी पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांबोळीतील कुजीरा शिक्षण संकुलात दुपारी दोन गटात राडा झाला. सकुलाच्या बाहेरील एका तरूणाने विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हा तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय तो अश्लील शिवीगाळ देखील करत असल्याचे समोर आलेल्या एका व्हिडिओतून दिसत आहे.

आगशी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत एकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

Bambolim Goa
Bicholim Goa: लोकसभा निवडणूक! डिचोलीत सुरक्षा यंत्रणा सतर्क; बंदोबस्त वाढवला, वाहनांची कसून तपासणी

दरम्यान, संकुलाच्या बाहेरील तरुण आणि विद्यार्थी यांच्या शाब्दिक वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की राग आनावर झालेल्या तरुणाने चाकूने विद्यार्थ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे संकुल परिसरात काहीकाळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com