Youth Drowned at Thivim lake: सहल पडली महागात, थिवी येथील कालव्यात युवक बुडाला

काही तरूण सहलीसाठी येथे गेले असता ही घटना घडली आहे.
Youth Drowned at Thivim lake
Youth Drowned at Thivim lakeDainik Gomantak
Published on
Updated on

Youth Drowned at Thivim Lake Goa: थिवी येथील कालव्यात तरूण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. काही तरूण सहलीसाठी येथे गेले असता आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता रेवोडा येथे ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुपारी पोलिसांना तरूणाचा मृतदेह सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज लोटलीकर (वय 21, रा. मडगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.

शनिवारी सात तरूणाचा एक गट सहलीसाठी या भागात आला होता. आज सकाळी रेवोडा येथे चिरेखाणीत पोहायला गेले असता अकरा वाजता ही घटना घडली. मृत राज लोटलीकर हा फोंडा येथील नागेश फार्मचे मालक लोटलीकर यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात देखील अशाच प्रकारच्या एका घटनेत करसवाडा येथील 23 वर्षांचा तरूणाचा बुडून मृत्यू झाला होता.

चार जुलै रोजी करसवाडा येथील 23 वर्षीय नसीम थिवी-माडेल येथील तलावात मित्रांसमवेत तलावात पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com