Farmer In Goa: पणजीत आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अटकेचा दक्षिण जिल्हा गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी निषेध केला आहे. उसगाव येथील संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी शेतकरी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
बंद असलेला संजीवनी साखर कारखाना किंवा इथेनॉल प्रकल्प तत्काळ सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. साखर कारखाना बंद झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत सरकारने इथेनॉल प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती.
मात्र, प्रकल्प उभारण्यात राज्य सरकार हलगर्जीपणा का करत आहे, असा आरोप त्यांनी केला. कारखाना कार्यान्वित झाल्यानंतर ऊस उत्पादन नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते.
संजीवनी साखर कारखाना 2020 पासून बंद असल्याने शेतकऱ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची पाच वर्षांची मुदत 2025 मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होतील,असा दावा नाडर यांनी केला.
भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती का नाही? पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सरकार देणार का? असे महेश नाडर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.